कोपरगाव-शिर्डीत एस.टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव-शिर्डीत एस.टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले (Video)

अडीच हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याच्या निर्णयावर एसटी कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे

रॅगिंग ही एक प्रकारची विकृतीच ः न्यायाधीश अलमले
केडगावमध्ये युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
घारगावमध्ये शेकडा ब्रासची रॉयल्टी आणि कोट्यवधींचे उत्खनन

अडीच हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याच्या निर्णयावर एसटी कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता मिळावा यासह विविध मागण्यांसाठी आपले बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले असून आज सकाळी सात वाजल्यापासून  कोपरगाव बस आगाराच्या प्रवेश द्वारावर हे उपोषण संयुक्त कृती समितीच्या वतीने सुरू करण्यात आल्याने  ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी एसटी कर्मचारी कालपासून राज्यभर उपोषणास बसले आहेत. मात्र काल यावर तोडगा न निघाल्याने अखेर आजपासून कामावर न जाण्याचा निर्णय एसटी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.त्यामुळे कोपरगाव शिर्डी या बस स्थानकातून आज एकही  एस.टी. सकाळपासून  गेली नाही.जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही एसटी बाहेर काढणार नाही या निर्णयावर एसटी कर्मचारी ठाम आहेत.

COMMENTS