कोपरगाव बाजार समितीत जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू-स्नेहलता कोल्हे.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव बाजार समितीत जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू-स्नेहलता कोल्हे.

कोपरगाव शहर प्रतिनिधी- शेतकरी वर्गासह त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्य घटकांना दिलासा मिळावा म्हणून कोरोणाचे सर्व नियम पाळून कोपरगाव बाजार समितीत

संगमनेरमध्ये खा. राहुल गांधींबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणार्‍यांचा निषेध
लौकीत नागरीकांचे कोरोना लसीकरण

कोपरगाव शहर प्रतिनिधी-

शेतकरी वर्गासह त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्य घटकांना दिलासा मिळावा म्हणून कोरोणाचे सर्व नियम पाळून कोपरगाव बाजार समितीत येत्या सोमवारपासुन (६ सप्टेबर) जनावरांचा व शेळी मेंढी बाजार पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असल्याची माहिती भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी दिली.

सौ. स्नेहलता कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बाजार समितीत जनावरांचा बाजार बंद होता, त्यामुळे अनेक अडचणी तयार झाल्या होत्या. त्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांच्याकडे आपण सातत्याने पाठपुरावा केला त्याला यश आले त्यांनी हा जनावरांचा बाजार सहा सप्टेंबर पासून पूर्ववत सुरू करावा म्हणून आदेश दिले आहेत.

कोपरगाव बाजार समिती आवारात आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने या भाऊ ची सर्व तयारी बाजार समिती आवारात करण्यात आलेली आहे सर्व नियम पाळून जनावरांचा बाजार पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाल्याचे बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे, उपसभापती राजेंद्र निकोले व सर्व संचालक मंडळाने सांगितले.,तरी शेतकरी, व्यापारी वर्गाने याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

COMMENTS