कोपरगाव तालुक्यातील शिर्डी पोलिस स्टेशन हद्दीतील गावात घरा-घरात गणपती

Homeताज्या बातम्याअहमदनगर

कोपरगाव तालुक्यातील शिर्डी पोलिस स्टेशन हद्दीतील गावात घरा-घरात गणपती

कोपरगाव शहर प्रतिनिधी - कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यां

नगर मनमाड रोडवर अपघात ; २ ठार तर तीन जण जखमी | LOKNews24
अटक न करण्यासाठी लाच घेणाराच झाला अटक
गंगापुरातील दिंडीचे नेवासाफाट्यावर उत्स्फूर्त स्वागत

कोपरगाव शहर प्रतिनिधी –

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत जवळके, धोडेंवाडी, राजणगाव देशमुख,अंजनापुर येथे येणाऱ्या गणेशोत्सव या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीसाठी शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील जवळके, राजणगाव देशमुख, धोडेंवाडी, अंजनापुर आदि गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व गणेश मंडळाचे अध्यक्ष उपस्थितीत होते.

या वेळी सर्व गावच्या सरपंच, पोलिस पाटील एक मुखाने पोलिस निरीक्षक यांना शब्द दिला की, आम्ही गावात सार्वजनिक गणपती न बसवता प्रत्येकाच्या घरात श्री गणेशाची प्राण प्रतिष्ठा करून घरगुती पद्धतीने या वर्षीच्या गणेशोत्सव साजरा करू असे आश्वासन दिले.

या निर्णयामुळे जवळके, रांजणगाव देशमुख, धोंडेवाडी, अंजनापूर आदी गावातील प्रमुखांनी घरगुती गणेशोत्सव साजरा करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS