कोपरगावात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई – पो नि देसले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात कोविड नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कठोर कारवाई – पो नि देसले

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. कलम १४४ नुसार संचारबंदी घोषित करुन अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध लादले आहेत.

बेलापूरकर डेंग्यु, चिकनगुनियाने त्रस्त
स्थायी समितीने वाढवले 24 कोटीने बजेट ; आजपासून मनपा महासभेत होणार चर्चा
दीपक करगळ यांची 5 हजार किलो आंब्यांची साई प्रसालयात देणगी

कोपरगाव शहर प्रतिनिधी : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. कलम १४४ नुसार संचारबंदी घोषित करुन अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवांवर निर्बंध लादले आहेत. याअंतर्गत सामान्य नागरिकांना विनाकारण फिरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तरी देखील कोपरगाव शहरात प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी दिला आहे. 

सध्या कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण होत आहे. रोज बाधितांच्या संख्येत नव्याने उच्चांकी भर पडत असून, अजूनही काही बेफिकीर नागरिक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करत आहे. याचा परिणाम आरोग्य व्यवस्थेवर झाला असून, रुग्णांना खाटा, प्राणवायू व औषधे मिळणेही मुश्किल झाले आहे. त्यामुळे नागरिकांची कोणत्याही सबळ अथवा अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. स्वतःसह कुटुंबाचा कोविड विषाणूपासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक नियमांचे तंतोतंत पालन करावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस  निरीक्षक देसले यांनी दिला आहे.

COMMENTS