कोपरगावमध्ये  ८ मे पर्यंत कडक जनता कर्फ्यु

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोपरगावमध्ये ८ मे पर्यंत कडक जनता कर्फ्यु

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहर व तालुक्या मध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन याबाबी रुग्ण संख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे.

तुम्ही हाक द्या आम्ही साथ देण्यासाठी सज्ज ः विवेक  कोल्हे
वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांची पोलिस भरतीत निवड
शेवगावात बदलापूर घटनेचा निषेध




कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव शहर व तालुक्या मध्ये कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हॉस्पिटल बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन याबाबी रुग्ण संख्येच्या तुलनेत कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. परिणामी रुग्ण मृत्युदर वाढला आहे.
कोरोना प्रतिबंध करणेकामी कोपरगाव शहरातील स्थानिक नागरिक, व्यापारी व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांचे मागणीनुसार शुक्रवार दि.३०/०४/२०२१ रोजी रात्री ८.०० वा पासून ते शनिवार दि.०८/०५/२०२१ रोजी सकाळी ७.०० वा पर्यंत कडक जनता कर्फ्यु राहणार आहे. 
या दरम्यान फक्त शहरातील दवाखाने, मेडिकल २४ तास रुग्ण सेवेसाठी सुरू असतील तर  पाणी जार व दुध हे सकाळी ७ ते ११ वा.यावेळेत सुरू राहतील. महत्वाचे म्हणजे भाजीपाला, फळे, किराणा व इतर सर्व व्यवसाय हे १००% बंद राहतील.
कोपरगाव शहरातील सर्व नागरिक, आस्थापना, व्यापारी यांना कळविण्यात येते की, आपण जीवना आवश्यक साधन सामुग्री येत्या दोन दिवसात जमा करावी.
दिनांक ०८/०५/२०२१ शनिवार पासून मा.जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार सकाळी ७ ते ११ यावेळी अत्यावश्यक आस्थापना सुरू राहतील.
कोरोनाचा प्रादुर्भाव व मृत्युचे थैमान थांबविण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून प्रत्येकाने स्वतःचा व कुटूंबाचा बचाव करावा ही नम्र विनंती नगराध्यक्ष विजय वहाडणे, उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, सर्वपक्षीय नगरसेवक व  कोरोना नियंत्रण समिती, कोपरगाव यांच्या वतीने कोपरगाव वासीयांना करण्यांत आले आहे.
 तसेच या नियमाचे कोणीही उल्लंघन केल्यास त्या  व्यक्तीवर  कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे वहाडणे यांनी सांगितले.

COMMENTS