कोपरगावकरानो आता तरी बदला- देसले

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कोपरगावकरानो आता तरी बदला- देसले

शनिवार आणि रविवारच्या कडक संचारबंदी नंतर कोपरगाव चा सोमवार उजेडला तो भाजीपाला, किराणा आणि अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली शहर वासीयांनी तोबा गर्दी करत.

श्रीगोंद्यात औद्योगिक वसाहतीची निर्मिती करा : उद्योगमंत्र्यांकडे मागणी
घंटागाडी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्या संपत्तीची चौकशी करून कारवाई करा

कोपरगाव शहर प्रतिनिधी- शनिवार आणि रविवारच्या कडक संचारबंदी नंतर कोपरगाव चा सोमवार उजेडला तो भाजीपाला, किराणा आणि अत्यावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली शहर वासीयांनी तोबा गर्दी करत. या मोजक्या बेशिस्त नागरिकांन मुळेच तालुक्यात कोरोना चा हाहाकार माजवत असल्याचे चित्र समोर येत आहे. 

  सोमवारी सकाळी १०.३० मी च्या सुमारास शहरातील विघ्नेश्वर चौकात खरेदी साठी गर्दी होऊन लांबच लांब गाड्याचा रांगा लागल्या असल्याची माहिती शहर पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांना समजताच त्यांनी तत्काळ आपल्या फौज फाट्यासह सदर गर्दी वर नियंत्रण मिळविले.


 या वेळी देसले यांनी कोपरगाव कराना आवाहन केले की, आपल्या शहरासह ग्रामिण भागात कोरोना ने रौद्ररूप धारण केले असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या नवनवीन उचांक गाठत असून तालुक्यातील मृत्यू संख्या देखील दररोज वाढत असतांना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणे सुद्धा अवघड होऊन बसले आहे. इतके सर्व होत असताना देखील आपण सर्व सुज्ञ नागरिक असे शासनाचे नियम पायदळी तुडवत अनावश्यक पणे गर्दी करणे योग्य नसून याचे आपण भान ठेवत प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियमाचे काटेकोर पणे पालन करत आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे अशी विनंती शहर पोलीस निरीक्षक देसले यांनी कोपरगाव वासीयांना करत  सर्व प्रशासन आपआपल्या परीने या कोरोना महामारी वर नियंत्रण मिळविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता  अहोरात्र प्रयत्न करत असून आमच्या सर्वांच्या प्रयत्नाला तुमची सर्वांची साथ हवी आहे तरच आपण या महामारीतून सुखरूप पणे लवकर बाहेर पडू असे मत देसले यांनी व्यक्त केले.

COMMENTS