कोतवाली पोलिसांनी काही तासातच भामट्याच्या आवळ्या मुसक्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोतवाली पोलिसांनी काही तासातच भामट्याच्या आवळ्या मुसक्या

नगर : प्रतिनिधीआ.संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून टीम 57 फॅमिली पान पकवानच्या माध्यमातून मार्केट यार्ड मधील महात्मा फुले चौकामध्ये गेल्या एक महिन्या

तहसीलदार देवरेंना न्याय मिळण्यासाठी सोमवारी काळ्या फिती लावून आंदोलन
Ahmednagar : संगमनेरमध्ये ६१ लाखांचा माल असलेला मालट्रक पळवला LokNews24
नागवडे कारखान्याची बदनामी थांबवा.. आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देऊ

नगर : प्रतिनिधी
आ.संग्राम जगताप यांच्या संकल्पनेतून टीम 57 फॅमिली पान पकवानच्या माध्यमातून मार्केट यार्ड मधील महात्मा फुले चौकामध्ये गेल्या एक महिन्यापूर्वी सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्यात आले आहे.

सध्या शहरांमध्ये चोरीचे सत्र वाढले आहे,पोलीस प्रशासन या चोऱ्यांमुळे हतबल झाले आहे. काही दिवसांपूर्वी मार्केट यार्ड येथून चोरट्यांनी रिक्षा चोरून नेत असताना टीम 57 ने बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये सदर चोरीची घटना कैद झाली,

यानंतर पोलिसांनी सदर घटनेचा तपास सुरू केला असता टीम 57 ने बसवलेल्या कॅमेराची मदत घेऊन तपासाची पुढील सूत्रे हलवली व या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे संबंधित चोरट्याला मुद्देमालासह जेरबंद केले.

गरीब रिक्षाचालकाने आपले वाहन सापडल्यामुळे त्याने कोतवाली पोलिसांचे व टीम 57 चे संचालक स्वप्निल पर्वते यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले.

सीसीटीव्ही कॅमेरे सध्या किती महत्त्वाचे आहे याचा एक उत्तम उदाहरण या घटनेतून समोर आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरा मुळे अशा अनेक घटनाना आळा बसण्यास मदत होते.

COMMENTS