कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री …

Homeताज्या बातम्यादेश

कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री …

विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नेत्याच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. बैठक दुपारी ३ वाजता होण

भाजपचा आमदार फुटला… ‘या’ पक्षात केला प्रवेश
मोठी घडामोड… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अमित शहांच्या भेटीला… युतीबाबत…?
९५ टक्के भारतीयांना पेट्रोलची गरज नाही… भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे…

विजय रुपानी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी नेत्याच्या निवडीची प्रक्रिया होणार आहे. बैठक दुपारी ३ वाजता होणार असल्याची माहिती गुजरात भाजपच्या प्रवक्त्यांनी दिली. गांधीनगरमध्ये ही बैठक होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि केंद्रीय संसदीयक कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पक्षाने निरीक्ष म्हणून पाठवलं आहे. पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघही अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. गुजरातल्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही इथं आलो आहोत. आम्ही आधी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि नंतर पक्षातील नेत्यांशी चर्चा करू, असं अहमदाबादमध्ये दाखल झालेल्या तोमर यांनी सांगितलं.

COMMENTS