कोंबडे झाकून सुर्य रोखणारे राजकारणी!

Homeताज्या बातम्यासंपादकीय

कोंबडे झाकून सुर्य रोखणारे राजकारणी!

सध्या राणा कुटूंबियांकडून उध्दव ठाकरे यांच्यावर सतत होणाऱ्या टिकेमुळे विचारला जातोय.खा.नवनीत राणा आणि रवि राणा या दाम्पत्यांकडून उध्दव ठाकरे आणि राजू

बेगानी शादी में……….! 
अखेर, आव्हान मिळालेच…!
ईव्हीएम ची प्रशंसा करित निवडणूका घोषित!

सध्या राणा कुटूंबियांकडून उध्दव ठाकरे यांच्यावर सतत होणाऱ्या टिकेमुळे विचारला जातोय.खा.नवनीत राणा आणि रवि राणा या दाम्पत्यांकडून उध्दव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्याकडून थेट शरद पवार टिकेच्या लक्ष्यस्थानी असल्याने आघाडीचे राजकारण तारेवरची कसरत बनली असल्याचे ठळकपणे जाणवते.महाविकास आघाडीचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्यावर फडणवीस,किरीट सोमैय्या ,चंद्रकांत पाटील विशेषतः नारायण राणेंसह दोन्ही सुपुत्रांकडून सातत्याने टिका होते आहे.विरोधी पक्षात असलेल्या या सदस्यांकडून अशी टिका होणे स्वाभाविक असले तरी महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या पक्षांशी  सहयोगी पक्ष म्हणून मिरवणाऱ्या छोट्या संघटनांचे नेते किंवा घटक पक्षांच्या पाठींब्यावर निवडणूक जिंकलेले अपक्ष नेते महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख कारभारी असलेल्या उध्दव ठाकरेंवर टोकाची टिका करू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.*लिड*

सहयोगी पक्षाच्या पाठींब्यावर निवडून आल्यानंतरही काही अपक्ष आमदार खासदार महाविकास आघाडी सरकारच्या नेतृत्वावर टिकेची झोड उठवीत असतील तर? असा प्रश्न सध्या राणा कुटूंबियांकडून उध्दव ठाकरे यांच्यावर सतत होणाऱ्या टिकेमुळे विचारला जातोय.खा.नवनीत राणा आणि रवि राणा या दाम्पत्यांकडून उध्दव ठाकरे आणि राजू शेट्टी यांच्याकडून थेट शरद पवार टिकेच्या लक्ष्यस्थानी असल्याने आघाडीचे राजकारण तारेवरची कसरत बनली असल्याचे ठळकपणे जाणवते.महाविकास आघाडीचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर उध्दव ठाकरे यांच्यावर फडणवीस,किरीट सोमैय्या ,चंद्रकांत पाटील विशेषतः नारायण राणेंसह दोन्ही सुपुत्रांकडून सातत्याने टिका होते आहे.विरोधी पक्षात असलेल्या या सदस्यांकडून अशी टिका होणे स्वाभाविक असले तरी महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या पक्षांशी  सहयोगी पक्ष म्हणून मिरवणाऱ्या छोट्या संघटनांचे नेते किंवा घटक पक्षांच्या पाठींब्यावर निवडणूक जिंकलेले अपक्ष नेते महाविकास आघाडी सरकारचे प्रमुख कारभारी असलेल्या उध्दव ठाकरेंवर टोकाची टिका करू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
राजकारणात कुणीही कुणाचा सदा सर्वकाळ मित्र किंवा शत्रू नसतो असा अलिखीत नियम आहे.त्याची प्रचिती अलिकडच्या भेसळयुक्त राजकारणात वारंवार येते.आज एखादा नेता आपल्या पक्ष नेत्याचे भरभरून गुणगाण गातो, निष्ठा आणि तत्वाची आदर्श पायवाट सोडणार नसल्याच्या आणाभाका घेतो,मात्र  त्याचे हितसंबंध जपले जात नाहीत किंबहूना अपेक्षीत असलेले पदरात पडत नाही असे लक्षात येताच उद्या दुसऱ्याच एखाद्या पक्षाशी सोयरीक करून कालच्या नेत्याला शिव्यांची लाखोली वाहतो. सध्या अशा आयाराम गयाराम नेतेमंडळींमध्ये शिवसेनेतून मनसेत,मनसेतून भाजपात,काँग्रेस राष्ट्रवादीमधून भाजपात गेलेल्या अशा अनेक नेत्यांची उदाहरणे अशा जातकुळीत चपखलपणे बसतात.यापुर्वीही पक्षांतरातून व्यक्तीपरत्वे एका रात्रीत  निष्ठा बदलाची परांपरा होती.तत्कालीन कारणेही वेगळी होती.अनेकदा तात्विक मतभेदातून अशी पक्षांतरे झाल्याचे पहायला मिळत होते.अपवादात्मक परिस्थिती सत्तेत अपेक्षीत वाटा मिळाला नाही म्हणूनही पक्षांतरे झाली.अलिकडच्या काळात मात्र उपरोक्त कारणे आहेतच,शिवाय वारंवार सत्तेच्या सहवासात राहून केलेली पापे चव्हाट्यावर येऊ नयेत म्हणून पक्षांतरे करण्याचे प्रमाण वाढले आहे.काही उदाहरणांमध्ये सत्तेत सहभाग मिळाला नसल्याचीही कारणे आहेत.या मुद्याची दखल घेण्यास निमित्त घडले ते अपक्ष खा.नवनीत राणा यांची उध्दव ठाकरे यांच्यावर ,रवि राणा यांचे काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यावर तोंडसुख घेणे आणि शरद पवार यांच्यावर राजू शेट्टींकडून सातत्याने होणारी टिका.खरेतर नवनीत राणा या लोकसभेच्या खासदार होण्याआधी राणा दाम्पत्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळ्यातील ताईत होते.तेच दाम्पत्य आता महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि काँग्रेसला पाण्यात पहात आहेत.त्याचे कारण लपलेले नाही.काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना सावकारी प्रकरणात राणा दाम्पत्याला झालेला त्रास हे या वादाचे खरे मुळ आहे.अर्थात विलासरावांनी तेंव्हा राणांना चौकटीबाहेर जाऊन मदत केली होती हे विसरता येणार नाही,बदलत्या राजकीय प्रवाहात केंद्र आणि राज्यातही भाजपा वरचढ ठरू लागल्याने राणा दाम्पत्य भाजपकडे झुकले,निवडणूकीच्या रिंगणात राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊनही निष्ठा मात्र भाजपच्या चरणी वाहील्या.भाजपप्रती असलेल्या या निष्ठा अधिक प्रबळ करण्यासाठी भाजपच्या डोळ्यात सलणाऱ्या उध्दाव ठाकरेंना राणा दाम्पत्य लक्ष्य करीता असण्याची दाट शक्यता आहे.दुसऱ्या बाजूला इकडे राजू शेट्टी याआनी लोकसभा विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला.हा संबंध जोडतांना उभयंतांमध्ये एखादा करार झाला असेल आणि तो करार राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून पाळला गेला नसेल म्हणून उठसूठ शरद पवारांवर निशाणा साधण्याचा अटोकाट प्रयत्न राजू शेट्टी करतांना दिसतात,हा करार काय असु शकतो हे राजू शेट्टी यांच्या वक्तव्यातून वारंवार बाहेर आलेच आहे,याचाच अर्थ सारेच कोंबड झाकून सुर्योदय होणार नाही या फाजील आत्मविश्वासाने राजकारण करतांना दिसत आहे.पाय मात्र सर्वांचेच बरबटलेले आहेत.

COMMENTS