कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रात मोठे योगदान ; डॉ. राऊत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रात मोठे योगदान ; डॉ. राऊत

शहरटाकळी  /प्रतिनिधी कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यांनी शाळा वसतिगृहे स्थापन करून समाजातील शेतकरी, शेतमजूर ,

संगमनेर तालुक्यातील ११ शिक्षकांना पुरस्कार जाहीर
कांदा विक्रीचे तब्बल दीड कोटी बुडवले…गुन्हा दाखल
शेततळ्यामध्ये पाय घसरून एकाचा मृत्यू

शहरटाकळी  /प्रतिनिधी

कॉम्रेड आबासाहेब काकडे यांचे शिक्षन क्षेत्रातील योगदान मोठे असून त्यांनी शाळा वसतिगृहे स्थापन करून समाजातील शेतकरी, शेतमजूर ,गोरगरीब दीनदलित यांना तसेच समाजातील तळागाळातील घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य केले,  त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष केला विविध पैलू मुळे कर्मयोगी आबासाहेबांना पोषक कौटुंबिक संस्कार मिळाले, योग्य शिक्षणाची संधी, त्यांची सेवा करण्याची वृत्ती, व्यसनापासून दूर राहण्याची वृत्ती, माणसांची पारख यामुळे त्यांचे जीवन खुलत गेले. कर्मयोगी आबासाहेब आयुष्यभर आपल्या जनते साठी झटले, लढले कार्य सिद्धीसाठी त्यांनी आपले आरोग्य जपले व्यायाम, सकस आहार, निर्व्यसनीपणा यांचा अंगीकार केला गोरगरिबांचा व सर्व समाजाच्या आयुष्यात दुःख कमी व्हावे, त्यांची शैक्षणिक, आर्थिक प्रगती व्हावी यासाठी ते झटले. असे प्रतिपादन अहमदनगर येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर व शहरटाकळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी  डॉ.अरुण राऊत  यांनी केले.

 शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कॉ. आबासाहेब काकडे यांचा 4 3वा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला , यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ.अरुण राऊत  बोलत होते. प्रमुख मान्यवर म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.अनिल मडके,  शाळेची माजी विद्यार्थिनी पोलीस निरीक्षक अनिताा फासाटे, शिवशाहीर कल्याण काळे, डॉ. अरुण पवार ,डॉ. जितेंद्र गांधी, डॉ. सोन्याबापु गादे, उद्योजक दत्तात्रय भालेराव,विद्यालयाचे प्राचार्य संपत दसपुते ,सामाजिक कार्यकर्ते अाबासाहेब राऊत , ग्रामपंचात सदस्य संदीप राऊत मेजर रमेश नरवडे ,बाळासाहेब खराडे 

पत्रकार रवींद्र मडके, नानासाहेब चेडे, देविदास दगडे मान्यवर आदी उपस्थित होते.

कॉ. आबासाहेब काकडे यांच्या  43 व्या पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त विद्यालयातील कलाशिक्षक शितलकुमार गोरे यांनी रेखाटलेल्या कर्मयोगी आबासाहेबांच्या व्यक्ती चित्राचे कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते अनावरण करण्यात

आले.  चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी, मेहंदी, कबड्डी, खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयातील  बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कॉ. आबासाहेब काकडे पुण्यतिथी  प्रमुख अतिथींच्या हस्ते पारितोषिक व प्रशस्तीपत्र देवून या विजयी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कलाशिक्षक शितलकुमार गोरे याांनी केले तर सूत्रसंचालन सुरेखा शेलार याांनी केले तर पर्यवेक्षिका अंजली चिंतामण यांनी  उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

COMMENTS