अहमदनगर प्रतिनिधी - पावसाळ्याचे दिवस सुरू असलेल्या केडगाव व उपनगरात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.पावसाचे पाणी गटार व ड्रेनेजमध्य
अहमदनगर प्रतिनिधी –
पावसाळ्याचे दिवस सुरू असलेल्या केडगाव व उपनगरात साथीच्या आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत.पावसाचे पाणी गटार व ड्रेनेजमध्ये ठीक-ठिकाणी साठल्यामुळे प्रमाणात डासाची उत्पत्ती निर्माण होत आहे.
त्यामुळे डेंगू सदृढ,मलेरिया,चिकन गुण्या गोचीड ताप आदीसह विविध आजारांचा फैलाव केडगाव परिसरामध्ये सुरू आहे.सर्वसामान्य नागरिकांना उपचार घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
यासाठी अहमदनगर महानगरपालिका आरोग्य विभागाने साथीच्या आजारावर आळा घालण्यासाठी भूषणनगर,मोहिणीनगर,अंबिकानगर, दूधसागर,आदर्शनगर,हनुमाननगर,इंद्रानगर,ताराबाग कॉलनी, विद्यानगर, कांबळे मळा, लोंढे मळा, कोतकर मळा, शास्त्रीनगर, घेबुड मळा, गुंड मळा,चौधरी मळा आदी सर्व परिसरांमध्ये साथीच्या आजाराचे विविध साथीच्या आजाराचे रुग्ण आढळत आहे
त्यामुळे सदर परिसरात विविध उपाययोजना सुरू कराव्यात तसेच औषध व धूर फवारणी केडगाव परिसरात सुरू करावी जेणेकरून विविध साथींच्या आजाराला आळा बसेल अशी मागणी दिलेल्या निवेदनाद्वारे आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे नगरसेवक मनोज कोतकर यांनी केली.
COMMENTS