कृष्णा हॉस्पिटलचा कोरोनामुक्तीचा 5000 चा टप्पा पूर्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कृष्णा हॉस्पिटलचा कोरोनामुक्तीचा 5000 चा टप्पा पूर्ण

पश्‍चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचा 5000 चा टप्पा पूर्ण केला आहे.

सिमेंट मिक्सर उलटून माय-लेकीचा मृत्यू
भाजपचे हिंदूत्व गोमूत्रधारी – उद्धव ठाकरेंची टीका
सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी आल नाही…उद्धव ठाकरे तुम्ही सुद्धा

आज 28 रुग्णांना डिस्चार्ज; दुसर्‍या लाटेत 1753 रुग्ण कोरोनामुक्त

कराड/ प्रतिनिधी : पश्‍चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचा 5000 चा टप्पा पूर्ण केला आहे. आज कृष्णा हॉस्पिटलमधून 28 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून, दुसर्‍या लाटेतही 1753 रुग्ण कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनामुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान दिले आहे. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे गेल्या वर्षी 18 एप्रिल 2020 रोजी पहिल्या कोरोनामुक्त रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिकाच सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या यशस्वी निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्तीचा आकडा वाढत, आजअखेर कृष्णा हॉस्पिटलने 5023 रुग्णांना कोरोनामुक्त केले आहे.

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ प्रदान करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. संजय पाटील, डॉ. विश्‍वास पाटील, रोहिणी बाबर यांच्यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

COMMENTS