कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यांना  मार्गदर्शन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

कोपरगाव प्रतिनिधी -कृषी विभाग मार्फत दिनांक २१ जून ते १ जुलै दरम्यान राबविण्यात येत असलेल्या  कृषी संजीवनी सप्ताह निमित्ताने तालुक्यातील धोत्रे व खोपडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

अहमदनगर जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये अकरा डिसेंबर रोजी लोकअदालत
उत्तरपत्रिकेसह प्रश्‍नपत्रिका आली चक्क मोबाईलवर… | DAINIK LOKMNTHAN
कर्जतच्या वनक्षेत्रात हरणाची शिकार

कोपरगाव प्रतिनिधी -कृषी विभाग मार्फत दिनांक २१ जून ते १ जुलै दरम्यान राबविण्यात येत असलेल्या  कृषी संजीवनी सप्ताह निमित्ताने तालुक्यातील धोत्रे व खोपडी येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.          
      तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव , मंडळ कृषी अधिकारी चांगदेव जवणे, कृषी पर्यवेक्षक मंडलिक  व आत्माचे शैलेश आहेर  यांनी शेतकऱ्यांना खरीप हंगामाचे नियोजन, बीबीएफ द्वारे पेरणी चे फायदे , पेरणी पूर्वी बीजप्रक्रिया करण्याचे फायदे, रासायनिक खते व कीटक नाशके वापरतांना घ्यावयाची काळजी, जमीन आरोग्य पत्रिकेनुसार  रा.खतांची १० टक्के बचत, मग्रारोहयो योजनेच्या फळबाग लागवडीच्या तांत्रिक बाबी, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना, फळपीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना अश्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी 
खोपडी गावचे सरपंच श्री संभाजी नवले व ग्रामसदस्य उपस्थित होते
कार्यक्रमाचे आयोजन व सूत्र संचालन कृषी सहायक एस ए दराडे यांनी केले

COMMENTS