राज्य सरकारच्या कृषी विभागाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2020-21साठी 38 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
मुंबई/प्रतिनिधी: राज्य सरकारच्या कृषी विभागाने राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना 2020-21साठी 38 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 38 कोटी रुपयांपैकी 19 कोटी वितरीत करण्यास मंजुरीदेखील देण्यात आली आहे. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध होणार आहे.
राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून केंद्र शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण उप अभियानासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येतो. उन्नत शेती-समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारने 38 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी 19 कोटी रुपये वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. सध्या शेतीमध्ये पारंपारिक औजारांचा वापर कमी होऊन यांत्रिकीकरण वाढत आहे. शेतीमधील मशागतीची कामे करण्यासाठी हवे तेवढे मनुष्यबळ मिळत नसल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि इतर औजारांचा वापर करणे गरजेचे बनत आहे. महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग कृषी यांत्रिकीकरण उप अभियानातून शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, शेतीमधील अवजारे, बैल चलित अवजारे, पक्रिया संच, इतर औजारांसाठीअनुदान उपलब्ध करून देत आहे. कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान योजनेअतंर्गत जेथे शेतीमधील उर्जेचा वापर कमी आहे, अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे, हा उद्देश आहे. प्रात्याक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे सहभागीदारमध्ये जागरुकता निर्माण करणे. कृषी यंत्र/ अवजारे यांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य देणे प्रशिक्षण व प्रात्यक्षिकाद्वारे सहभागीदारांना कृषी यांत्रिकीकरणास प्रोत्साहित करणे, हा उद्देश आहे.
COMMENTS