कु. स्नेहा जाधव हिचा राज्यस्तरीय विक्रम

Homeमहाराष्ट्रसातारा

कु. स्नेहा जाधव हिचा राज्यस्तरीय विक्रम

सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनची आंतरराष्ट्रीय खेळाडू कु.

कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक
भिंगारच्या ’त्या’ घटनेबद्दल नोंदवले 40 जबाब ; येत्या दोन-तीन दिवसात अहवाल अपेक्षित, पोलिस व नागरिकांचे लक्ष
कृष्णा विश्‍व विद्यापीठाचा शुक्रवारी 11 वा दीक्षांत सोहळा

कराड / प्रतिनिधी : सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनची आंतरराष्ट्रीय खेळाडू कु. स्नेहा सुर्यकांत जाधव हिने पटियाला पंजाब येथे झालेल्या 24 व्या राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धेत महिला खुला गटात हातोडा फेक या क्रीडा प्रकारात 53.99 मी अंतर पार करीत राखी गौंड हिच्या 15 वर्षापूर्वीच्या 51.89 मी. या विक्रमाला मागे टाकत नवीन राज्यस्तरीय विक्रम प्रस्थापित केला. राष्ट्रीय फेडरेशन स्पर्धेत चतुर्थ स्थानापर्यत मजल मारली. या अभूतपूर्व यशाबद्दल तिचा व तिला मार्गदर्शन करणारे एनआयएस प्रशिक्षक दिलीप चिंचकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी कराड तालुका अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनचे उपाध्यक्ष शशिकांत पाटील, निरंजन साळुंखे, राष्ट्रीय प्रशिक्षक अतुल पाटील, राष्ट्रीय प्रशिक्षक संजय राठोड, खजिनदार प्रा. अमितराज माने, सचिव योगेश खराडे, राष्ट्रीय खेळाडू संग्राम बाबर, मोहसीन मोमीन यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खेळांडूना मार्गदर्शन करताना अशोकराव थोरात म्हणाले, स्नेहा जाधव हिने संपादन केलेले यश कौतुकास्पद आहे. तेंव्हा तुम्ही असे मोठे स्वप्न तुमच्या अंतकरणात जपाल, तेंव्हा आपोआप तुमचा प्रवास त्या स्वप्नांच्या दिशेने होईल. जेव्हा शिष्य तयार असतात तेव्हा गुरू भेटतात. तेंव्हा तुम्ही सातत्याने खेळासाठी तयार असले पाहिजे. अशा खेळ व खेळाडूंच्या विकासासाठी सातारा जिल्हा अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन नेहमीच प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी खेळाडूंना दिली.

आंतरराष्ट्रीय खेळाडू स्नेहा जाधव हिच्या कामगिरीचा आढावा घेतला. स्नेहा जाधव हिने राष्ट्रीय स्पर्धेत आत्तापर्यत 16पदके जिंकलीअसून सन 2016 मध्ये तुर्की येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना 8 वा क्रमांक, बँकाँक येथे झालेल्या ज्युनिअर आशियाई स्पर्धेत 6 वा क्रमांक संपादन केला. विशेष म्हणजे सन 2016 पासून तिच्या वयोगटात हातोडाफेक या क्रीडा प्रकारात ती महाराष्ट्रात अव्वल स्थानी असल्याचे प्रास्ताविकपर भाषणांत दिलीप चिंचकर यांनी सांगितले.

COMMENTS