कुमठे विकास सेवा सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के कर्जाची वसुली

Homeमहाराष्ट्रसातारा

कुमठे विकास सेवा सोसायटीची बँक पातळीवर शंभर टक्के कर्जाची वसुली

सातारा तालुक्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब महाराज व सातारा-जावली तालुक्याचे कार्यसम्राट आ. श्री. छ.

‘द काश्मीर फाइल्स’ पाहून प्रेक्षक ढसाढसा रडले
विजेचा दाब वाढल्याने विद्युत उपकरणे जळून खाक
सीमाभागातील ऊस आंदोलन पेटले

सातारा / प्रतिनिधी : सातारा तालुक्याचे भाग्यविधाते स्व. भाऊसाहेब महाराज व सातारा-जावली तालुक्याचे कार्यसम्राट आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विचारांचे संचालक मंडळ असलेले कुमठे विकास सेवा सोसायटी लि., कुमठे तालुका सातारा या संस्थेने माहे मार्च महिन्यातच बँक पातळीवर 100 टक्के कर्जाची वसुली करून एक आदर्शवत काम केले आहे.  

या कामगिरीबद्दल संस्थेचे चेअरमन अरविंद चव्हाण, व्हा. चेअरमन सुरेंद्र देशपांडे, सचिव संतोष राऊत यांचा सत्कार बँकेचे संचालक प्रदीप विधाते यांच्या हस्ते संचालक नितिन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजेंद्र भिलारे, उपव्यवस्थापक भानुदास भंडारे, विकास अधिकारी गणेश जाधव यांचे उपस्थितीत करणेत आला. 

याप्रसंगी श्री. नितीन पाटील, प्रदीप विधाते व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी कुमठे विकास सोसायटीच्या पदाधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले. 

संस्थेच्या सभासदांनी 31 मार्च पूर्वीच पिक कर्जाची परतफेड केल्याने सभासदांना केंद्र शासनाचा 3%, राज्य शासनाचा 3% व्याज परतावा मिळणार आहे. तसेच शासनाच्या व बँकेच्या विविध योजनाचाही सर्व सभासदांना फायदा घेता येणार आहे. अशी माहिती सरव्यवस्थापक श्री.राजेंद्र भिलारे यांनी दिली. संस्थेने बँक पातळीवर 100 टक्के कर्जाची वसुली केल्याबद्दल आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संस्था पदाधिकारी व सभासदांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

COMMENTS