कुपोषण मुक्तीसाठी पोषण आहार चळवळ यशस्वी करा : मनोज ससे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुपोषण मुक्तीसाठी पोषण आहार चळवळ यशस्वी करा : मनोज ससे

प्रतिनिधी : अहमदनगर  अहमदनगर जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी घराघतात पोषण आहार चळवळ पोहोचली पाहिजे, घरातील मुले आणि महिलांना काय आवडते त्यांच्य

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या श्रीरामपूर विधानसभा समितीत खंडागळे यांची सदस्यपदी नियुक्ती
Ahmednagar : सैनिक व त्यांच्या कुटुंबियांना शासकीय कामासंदर्भात अडचण भासू देणार नाही l LokNews24
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली |

प्रतिनिधी : अहमदनगर 

अहमदनगर जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी घराघतात पोषण आहार चळवळ पोहोचली पाहिजे, घरातील मुले आणि महिलांना काय आवडते त्यांच्या आवडीनिवडीचा विचार करुन अन्न पदार्थ बनवले जावे, व घरातील सव सदस्यांनी एक बसून भोजन  करावे  असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांनी केले.

            अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथे राष्ट्रीय पोषण माह निमित्त ,बालकाचा आहार आणि कुपोषणाची कारणे, या विषयी दोन दिवशीय  जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अहमदनगर येथील क्षेत्रीय लोकसंपर्क ब्यूरो आणि अहमदनगर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत जिल्हा कुपोषण मुक्त करण्यासाठी एक मोहिम हाती घेण्यात आली असल्याचे ससे म्हणाले.

            या कार्यक्रमास नेवासा पंचायत समितीचे उपसभापती किशोर जोजार, भानसहिवरा गामपंच्यातीच्या सरपंच मिनातीई जोजार,महिला बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, क्षेत्रीय प्रचार आधिकारी माधव जायभाये, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी पी. कुमार, बालविकास प्रकल्प अधिकारी सोपण ढाकणे, डॅा ढवण  आदि मान्यवर उपस्थित होते.

निरोगी समाज,कुपोषण मुक्त भारत  आणि वयक्तिक विकास  व देशाच्या निरंतर प्रगतीसाठी आई आणि बाळाच्या पोषण आहाराकडे  घरातील प्रत्येक सदस्यांनी लक्ष दिले पाहिजे, किशोरवयीन मुली, गरोदर माता, शून्य ते 6 वयोवर्षे गटातील मुलांच्या पोषण आहाराकडे घरातील प्रत्येत व्यक्तिंनी काळजीपुर्वक लक्ष देऊऩ त्यांना सकस  पोषणयुक्त आहार दिला पाहिजे  तसेच स्त्री पुरुष असा कसलाही भेदभाव न करता किशोरवयीन मुलीच्या आहाराबरोबरच गरोदर माता, बालकांच्या दैनंदिन पौष्टीक आहारात कड़धान्य, स्थानिक फळे आणि भाजीपाला,  दूध या घटकांचा समावेश असावा व त्यांच्या आवडी-निवडी प्रमाणे पोषक आहार दिल्यास कुपोषणाचा प्रश्न मिटेल आणि आई-बालके कुठल्याच आजाराला बळी पडणार नाहीतअसे मत आज या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात गावात पोषण आहार रॅलीने करण्यात आली यावेळी गावातील किशोरवयीन मुली, अंगणवाडी कार्यकर्त्या-मदतनीस  यांनी हतात पोषण आहाराचे विविध पदार्थ, कडधान्य, फळे आणि भाजीपाला घेऊन सर्वांचे लक्ष वेधले.

आंगणवाडी कार्यकर्त्या आणि मदतनिस यांनी घरच्या घरीच  स्थानिक अन्नधान्य, फळे आणि पालेभाज्यातून तयार केलेल्या पोषण आहार प्रदर्शनात  जवळपास 80 प्रकारच्या पदार्थ आसलेल्या ताटांचा समावेस होता. दोन दिवशीय या अभियानात, रांगोळी, सकस आहार, सूदृढ बालक तसेच आदर्श माता स्पर्धा घेण्यात आल्या, या स्पर्धेतील गुनवंत किशोरवयीन मुली आणि विजेत्या 26 स्पर्धकांचा तसेच पोषण आहार कार्यक्रम राबविणा-या आंगणवाडी कार्यकर्त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पोरितोषिक देऊन   सन्मान करण्यात आला.

यावेळीजयहिंद कलामंचाचे शाहिर हमीद सय्यद  यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून पोषण आहारविषयी जनजागृती केली.  केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या वतिने राष्ट्रीय पोषण माह 2021, निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून जनतेमध्ये आई-बाळाच्या आरोग्यासाठी पोषण आहाराचे महत्व पटऊन देण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या निमित्त ‘सही पोषण देश रोषण’ या युक्ती प्रमाणे  देशात वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षिका शामला गायधने यांनी केले तर प्रास्ताविक क्षेत्रीय प्रचार आधिकारी माधव जायभाये यांनी केले.

COMMENTS