Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंभमेळ्यात शिरला कोरोना ; विस्फोटाची शक्यता; देशात घरोघर जाऊन कोरोनाचे लसीकरण

देशात कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यात विषाणूने शिरकाव केला आहे.

पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार राजीव गांधी विदयार्थी अपघात सानुग्रह योजनेचा लाभ 
नोरा-सिद्धार्थच्या बोल्ड केमिस्ट्रीने जिंकली चाहत्यांची मने
श्रीगोंद्यात खा. शरद पवारांच्या हस्ते होणार रयत संकुलच्या इमारतीचे उद्धाटन

नवीदिल्ली ः देशात कोरोनाचा उद्रेक झालेला असतानाच लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या हरिद्वारमधील कुंभमेळ्यात विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये कोरोनाचा मोठा स्फोट होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी घरोघर जाऊन कोरोनाची लस देण्याचा विचार केंद्र सरकार करीत आहे. 

हरिद्वारमध्ये दोन दिवसात एक हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून आले आहेत. उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये महाकुंभ मेळावा सुरू आहे. हरिद्वारमधील गंगेच्या काठावर होत असलेल्या कुंभमेळ्यात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. हरिद्वारमध्ये मंगळवारी 594 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. सोमवारी हरिद्वारमध्ये 408 रुग्ण आढळले होते. सध्या हरिद्वारमध्ये 2 हजार 812 रुग्ण उपचार घेत असून, पहिल्या दोन शाहीस्नान सोहळ्याला लाखो भाविकांनी गर्दी केली होती. कुंभमेळा सुरू असलेल्या परिसरात कुठेही मुखपट्टीची सक्ती करताना कोणीही आढळून आले नाही. रेल्वे स्टेशन आणि इतर चेक पॉईंटच्या ठिकाणी थर्मल स्क्रिनिंगही केले जात नाही. कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा करण्यात आलेला नाही. विविध तपासणी नाक्यांवर रिपोर्ट न आणलेल्यांनाही जाऊ दिले जात होते.  कोरोनाचे संकट गडद होत चालल्याच्या पार्श्‍वभूमीवर घरोघरी जाऊन कोरोनावरील लस देण्याबाबत केंद्र सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ शकते, अशी माहिती आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिली. असा निर्णय घेतला गेला, तर 45 वर्षाखालील लोकांचे लसीकरणही झपाट्याने करता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. स्फुटनिक व्ही लसीचा वापर करण्यास अलीकडेच सरकारने परवानगी दिलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर काही कंपन्यानी घरोघरी जाऊन लस देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे संपर्क साधला आहे. या प्रस्तावावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत सरकारने लसीकरणाच्या कामालादेखील मोठी गती आणली आहे. जास्तीत जास्त लोकांना लस द्यायची असेल, तर 45 वर्षाखालील लोकांना लस देणे गरजेचे आहे, त्यामुळे याबाबतीतही सरकार काम करीत असल्याचे समजते. 

खासगी कंपन्या सहकार्यास तयार

खासगी क्षेत्रातील अनेक कंपन्यानी घरोघरी जाऊन लसीकरण करू, असा प्रस्ताव केंद्र सरकारला दिलेला आहे. लसीकरणासाठी प्रती व्यक्ती 25 ते 37 रुपये आकारण्याची मुभा द्यावी, असे या प्रस्तावांमध्ये म्हटलेले आहे. घरोघरी जाऊन लस देण्याबाबत निर्णय घेण्यात आला, तरी सुरुवातीच्या काळात या कंपन्याना सरकारी नेटवर्कचा वापर करावा लागणार आहे.

COMMENTS