किरीट सोमय्यांचा दावा… अनिल देशमुख दिवाळीच्या आधीच जेलमध्ये जाणार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किरीट सोमय्यांचा दावा… अनिल देशमुख दिवाळीच्या आधीच जेलमध्ये जाणार

प्रतिनिधी : मुंबईमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. ईडी आणि सीबीआय पाठोपाठ आता देशमुखांच्या मालमत्तांवर काल आयकर

अदा शर्मा हिने गायली मराठी कविता
मुलींची बेपत्ता होण्याची संख्या चिंताजनक
Jio ने दोन नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केले

प्रतिनिधी : मुंबई
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होताना दिसत आहे. ईडी आणि सीबीआय पाठोपाठ आता देशमुखांच्या मालमत्तांवर काल आयकर विभागाने धाड टाकली.

सलग दुसऱ्यादिवशीही आयकर विभागाचे धाडसत्र सुरू होते. आयकर विभागाकडून तब्बल १६ तास त्यांच्या निवासस्थानी झाडाझाडती करण्यात आली. त्यांच्यावर कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या प्रकरणाबाबत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागेल, असा दावा केला आहे.

तसेच यानंतर किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. देशमुखानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“परिवहन मंत्री अनिल परब यांनी नोटीस पाठवून माफी मागण्यास सांगितले होते. परंतु, त्यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट त्यांनी साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे.”

त्याचबरोबर, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्नीच्या नावे १९ बेनामी बंगले बांधले आहेत. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी. मी उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना घाबरत नाही. परब हे आता जेलमधूनच कोर्टात जाऊ शकतात. सर्वांना कायदा समान आहे.” असे सोमय्या म्हणाले.

तसेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे स्टंटबाज आहेत. ते लक्ष डायव्हर्ट करण्याचे काम करत आहेत. उद्धव ठाकरेंनी नेमलेले मंत्री, पोलीस आयुक्त फरार झाले आहेत. हे सरकार सामान्य जनतेचे नव्हे तर घोटाळेबाजांचे नेतृत्व करत आहे, अशी घणाघाती टीकाही सोमय्या यांनी केली.

COMMENTS