कार वरील ताबा सुटल्याने कार आणि चालक थेट नाल्यात.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कार वरील ताबा सुटल्याने कार आणि चालक थेट नाल्यात.

कोपरी सिग्नल जवळ घडली घटना .

नवी मुंबई- आज सकाळी एपीएमसी(APMC) वरून वाशी(Vashi) ला जाणाऱ्या कारचा अपघात झालाय. जोरदार पाऊस सुरू असल्याने कोपरी सिग्नल (Corner signal) जवळ वाहन चाल

ऑनलाईन भाडेकरू शोधणे पडले महागात
Bigg Boss च्या घरात रुचिरानं घेतला उखाणा
एच3एन2 विषाणूमुळे भारतात दोघांचा मृत्यू

नवी मुंबई- आज सकाळी एपीएमसी(APMC) वरून वाशी(Vashi) ला जाणाऱ्या कारचा अपघात झालाय. जोरदार पाऊस सुरू असल्याने कोपरी सिग्नल (Corner signal) जवळ वाहन चालकाचा कार वरील ताबा सुटला आणि कार थेट नाल्यात कोसळण्याची घटना घडली. नाल्याला संरक्षक भिंत नसल्यामुळे आणि पाऊसही जोरदार पडत असल्याने कार चालकाला रस्त्याच्या अंदाज न आल्याने कार थेट नाल्यात कोसळली. वाहन चालकाने प्रसंगावधान साधत दुर्घटनेनंतर तात्काळ वाहनातून बाहेर आल्याने कोणतीही हानी झाली नाही. सध्या नाल्यात पडलेली कार बाहेर काढण्यात येत आहे.

COMMENTS