कारखान्यांची आरआरसी केली नाही तर धमाका करणार : राजू शेट्टी

Homeमहाराष्ट्रसातारा

कारखान्यांची आरआरसी केली नाही तर धमाका करणार : राजू शेट्टी

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ज्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्यांची आरआरसी करायला आम्ही तयार आहोत, असे आश्‍वासन दिले आहे.

इस्लामपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी दालनात राष्ट्रवादीच्या आजी-माजी नगरसेवकांची हमरी-तुमरी
राहाता शहरांमध्ये स्वच्छतेसाठी नागरिकांचे ठिकठिकाणी श्रमदान
श्रीगोंदा खादी ग्रामोद्योग संघाचे कर्ज प्रकरणे लवकर सुरू करणार

कराड / प्रतिनिधी : सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी ज्या कारखान्यांनी पूर्ण एफआरपी दिलेली नाही, त्यांची आरआरसी करायला आम्ही तयार आहोत, असे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे 5 एप्रिलपर्यंत थकीत कारखान्यांची आरआरसी केली नाही. तर यापूर्वी झाला नाही, असा धमाका गनिमी काव्याने करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आज कराड येथे दिला.

थकित एफआरपी आणि वीज बिलासंदर्भात राजू शेट्टी यांनी आज सह्याद्री कारखान्यावर धरणे आंदोलनाचा इशारा दिला होता. सह्याद्री कारखान्यांवर पोहोचणे अगोदरच पोलिसांनी राजू शेट्टी यांना महामार्गावर ताब्यात घेऊन कराडच्या शासकीय विश्रामगृहात आणले. तेथे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व राजू शेट्टी यांच्यात बैठक होऊन चर्चा झाली.

योवळी राजू शेट्टी म्हणाले, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 1 एप्रिल रोजी साखर आयुक्तालयात जाऊन साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपीची माहिती घेणार आहेत. 15 मार्चअखेर साखर कारखान्यांकडे 2885 कोटी एफआरपी थकीत होती. 15 दिवसांत 500 कोटी थकित वसुल झाली असल्याचा सहकार मंत्र्यांचा दावा आहे. आम्ही 5 एप्रिल रोजी साखर आयुक्तालयात जाऊन साखर आयुक्तांकडून माहिती घेणार आहोत. तोपर्यंत एफआरपी दिली गेली नाही, तर यापूर्वी झाला नाही असा धमाका करू. तसेच साखर आयुक्तांना घेराव घालू. 

सह्याद्री साखर कारखान्यावर आंदोलनास निघालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले

साखर कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या उसाची एफआरपी रक्कम अद्याप दिली नाही. शेतकर्‍यांच्या मागण्यांसाठी राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर गुरुवार, दि. 25 रोजी आजपासून धरणे आंदोलन करण्यासाठी निघालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले आहे. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांच्या वादावादी झाली. मसूर गावाजवळ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. 

धरणे आंदोलनास निघालेल्या कार्यकर्त्यांनी उस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा, शेतकर्‍यांना एफआरपी रक्कम मिळालीच पाहिजे, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. आजपासून सह्याद्री सहकारी साखर कारखान्यावर एफआरपीचे पैसे मिळण्यासाठी मी बसणार आहे, तुम्ही या, असे अवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.

COMMENTS