चिचोंडी पाटील : कै .दादापाटील शेळके व कै.बन्सीभाऊ म्हस्के यांच्या सुवर्ण काळाप्रमाणे कांग्रेस आयला पुन्हा सोनेरी दिवस यावेत यासाठी सर्वांनी एक
चिचोंडी पाटील :
कै .दादापाटील शेळके व कै.बन्सीभाऊ म्हस्के यांच्या सुवर्ण काळाप्रमाणे कांग्रेस आयला पुन्हा सोनेरी दिवस यावेत यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन संघटितपणे सुत्रबद्ध रीतिने कार्य करने गरजेचे आहे. यातुन कांग्रेसला आपला मतदाराचा टक्का वाढवणे सहज शक्य होईल . त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडनुका बरोबरच इतर निवणुकात यश मिळण्यास मदत होईल तीच खऱ्या अर्थाने या दोन्ही नेत्यांना श्रद्धांजली ठरेल असे प्रतिपादन काँग्रेस आय चे जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे यांनी केले.
नगर तालुका कांग्रेस आय कमेटीच्या वतीने टाकळी काझी येथील बन्सीभाऊ मस्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कार्यकर्ता शीबीराचे आयोजन करण्यात आले होते . त्यात मागदर्शन करतांना ते बोलत होते .
बैठकीचे अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा काँग्रेस आय कमेटीचे जिल्हाअध्यक्ष बाळासाहेब साळुंखे हे होते . यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके , कै दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ, नगर तालुका काँग्रेस आय चे अध्यक्ष संपतराव म्हस्के , जिल्हा काँग्रेस आय चे जिल्हा सरचिटणीस आबासाहेब कोकाटे, पंचायत समितीचे माजी उपसभापती व अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त जयवंतराव वाघ , नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक दत्ता पाटील नारळे , नगर तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अक्षय कुलट, अंकुश पाटील शेळके, गुलाबराव काळे, डॉ ययाति फिसके, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी कोरोना काळात दिवंगत नेते कार्यकर्ते यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगर तालुका काँग्रेस आय चे अध्यक्ष संपतराव मस्के यांनी केले.
यावेळी बोलताना जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रतापराव पाटील म्हणाले की आपल्या जिल्ह्याला जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर विराजमान होण्याचा सन्मान काँग्रेस पक्षाला मिळाला. या पदाच्या माध्यमातून जिल्हाभर व नगर तालुक्यातील शाळांना मोठ्या प्रमाणात शाळा खोल्यांची काम करण्यात आली. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकामासाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला. या कामांच्या माध्यमातून आपण जनसामान्यांच्या हिताची जोपासना केली. मतदार वर्ग आकर्षित करण्यासाठी या कामाला आपल्याला निश्चित फायदा मिळेल.
अंकुश पाटील शेळके म्हणाले की केवळ वर्षातून एखादी बैठक घेऊन पक्ष वाढीचे काम होणे कठीण आहे. त्यामुळे पक्षासाठी संपर्क कार्यालय आवश्यक आवश्यकता आहे. यात पक्ष पदाधिकारी व वरिष्ठ नेतेमंडळींनी लक्ष घालून प्रयत्न करावेत. जेणेकरून काँग्रेसचे कार्यकर्ते सातत्याने एकत्र येऊन विचार विनिमय करण्यासाठी जागा उपलब्ध होईल व पक्ष संघटन बळकट होण्यास मदत होईल .
अध्यक्षीय भाषणातून जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंके म्हणाले की सातत्याने खोटं बोलण्याने समाजाला ते खरे वाटू लागते आणि लोक त्यावर विश्वास ठेवू लागतात. अशाप्रकारे गेल्या दोन्ही निवडणुकीच्या कालावधीमध्ये भाजपाने काँग्रेस विषयी खोटे विधाने करत लोकांना भ्रमित करून निवडणूका जिंकल्या. त्यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करण्यात कांग्रेस कार्यकर्तै कमी पडल्याने आपल्याला फटका बसला. काँग्रेसने गेली सत्तर वर्षे काय केले असा सवाल करणाऱ्या भाजपाने गेल्या सात वर्षात काँग्रेसने केलेल्या मोठ-मोठ्या शासकीय संस्था विकायला काढले आहेत. त्यामुळे आपण काय केले ते लोकांपर्यंत पोहोचवणे हे आपले काम असून त्यासाठी जिल्हा समन्वयक वाफारे यांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब केल्यास काँग्रेसला स्वबळावर निवडणूका लढविता येणे शक्य होईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपतराव म्हस्के यांनी केले तर आभार प्रदर्शन अशोक ढगे यांनी मानले.
COMMENTS