कर्जत नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा ; भाजपच्या प्रा. राम शिंदेंना पुन्हा धक्का

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत नगरपंचायतवर राष्ट्रवादीचा झेंडा ; भाजपच्या प्रा. राम शिंदेंना पुन्हा धक्का

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 12 तर काँग्रेसने 3 जागा जिंकून सत

शहरटाकळी येथे अखंड हरिनाम सप्ताहास 23 ला  प्रारंभ  
*मराठा आरक्षणाच्या अहवालातील 4 हजार पाने गायब? पहा सकाळच्या ताज्या बातम्या | LokNews24*
पालखी सोहळ्यातून राजमुद्रा प्रतिष्ठाणने धार्मिक परंपरा जपली

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत नगरपंचायतीत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने 12 तर काँग्रेसने 3 जागा जिंकून सत्ता काबीज केली आहे. भाजपला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांना या निकालातून दिलेला दुसरा मोठा धक्का आहे. गेल्यावेळी एकही जागा न मिळालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने यावेळी कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे.
कर्जत नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी निवडणूक झाली. त्यातील एक जागा सुरुवातीलाच राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध मिळविली होती. त्यानंतर ओबीसींच्या आरक्षणाचा वाद होऊन त्या जागांवरील निवडणूक स्थगित झाली. ती खुल्या प्रवर्गात समाविष्ट करून पुन्हा घेण्यात आली. अशा 16 जागांसाठी बुधवारी मतमोजणी झाली. सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती.
राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली गेली. पवार यांचे वर्चस्व आणि शिंदे यांचे अस्तित्व या दृष्टीने महत्वाची मानली जात आहे. यापूर्वी नगरपंचायतीत भाजपची सत्ता होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला नगरपंचायतीत खातेही उघडता आले नव्हते. पुढे विधानसभेत भाजपचे शिंदे यांचा पराभव करून आमदार पवार विजयी झाले. तेव्हापासून या मतदारसंघातील समीकरणे बदलली. नगरपंचायतीच्या तोंडावरच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे यांची साथ सोडून पवार यांच्या गोटात सहभागी झाले. त्यामुळे भाजपला नवख्या उमेदवारांना सोबत घेऊन निवडणूक लढवावी लागली. प्रचारात विविध मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोप झाले. भाजपकडून पवार यांच्यावर दडपशाहीचा आरोप करून आंदोलनही करण्यात आले. त्यामुळे निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

कर्जत नगरपंचायत विजयी उमेदवार असे : कंसात मिळालेली मते व पक्ष
प्रभाग 1- ज्योती लालासाहेब शेळके (461, राष्ट्रवादी), प्रभाग 3- संतोष सोपान म्हेत्रे (554, राष्ट्रवादी ), प्रभाग 4- अश्‍विनी गजानन दळवी (439, भाजपा), प्रभाग 5- रोहिणी सचिन घुले (474, काँग्रेस), प्रभाग 6- मोनाली ओंकार तोटे (225, काँग्रेस), प्रभाग 7- सतीश उद्धवराव तोरडमल पाटील (323, राष्ट्रवादी), प्रभाग 8- भाऊसाहेब सुधाकर तोरडमल (499, काँग्रेस), प्रभाग 9- अमृत श्रीधर काळदाते (355, राष्ट्रवादी), प्रभाग 10- उषा अक्षय राऊत (644, राष्ट्रवादी), प्रभाग 11- मोहिनी दत्तात्रय पिसाळ (298, भाजपा), प्रभाग 12- नामदेव चंद्रकांत राऊत (648, राष्ट्रवादी), प्रभाग 13- सुवर्णा रवींद्र सुपेकर (329, राष्ट्रवादी), प्रभाग 14- ताराबाई सुरेश कुलथे (332, राष्ट्रवादी), प्रभाग 15- भास्कर बाबासाहेब भैलुमे (464, राष्ट्रवादी), प्रभाग 16- प्रतिभा नंदकिशोर भैलुमे (361, राष्ट्रवादी), प्रभाग 17- छाया सुनील शेलार (726, राष्ट्रवादी). प्रभाग दोनमध्ये राष्ट्रवादीच्या लंकाबाई देविदास खरात या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत.

COMMENTS