कर्जत प्रतिनिधी कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील हिंमत तनूजा जाधव (वय : ४१) यांचे आज पुणे येथे दुःखद निधन झाले. ते राज्य उत्पादन शुल्क व
कर्जत प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू येथील हिंमत तनूजा जाधव (वय : ४१) यांचे आज पुणे येथे दुःखद निधन झाले.
ते राज्य उत्पादन शुल्क विभाग, पुणे येथे हवालदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
गेली सात वर्षे ते ब्लड कॅन्सरने त्रस्त होते. अखेर शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मावलली. तरुण तडफदार व कर्तव्यनिष्ठ सेवकाच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.
ते अतिशय मेहनती व मनमिळाऊ स्वभावाचे होते. खूप हलाखीच्या परिस्थितीतून ते विभागात भरती झाले होते.
COMMENTS