कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुमारे सहा महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाची बंद केलेली एसटी बसची फेरी किरपेत पुन्हा सुरू करण्यात आली.
सहा महिन्यांनंतर बस गावात; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
कराड / प्रतिनिधी : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुमारे सहा महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाची बंद केलेली एसटी बसची फेरी किरपेत पुन्हा सुरू करण्यात आली. गावातील विध्यार्थी व ग्रामस्थ व सरपंच, उपसरपंच, सदस्यांच्या पुढाकारातून मंगळवारपासून बस सुरू झाल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
मंगळवारी सकाळी आठ वाजता किरपे, ता. कराड येथील गावातील मुख्य चौकात चालक व वाहकाचा सरपंच प्रज्ञा देवकर व उपसरपंच विजय देवकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
किरपे गावात सुमारे सहा महिन्यांपासून बंद करण्यात आलेली बस नुकतीच सुरु करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसद्वारे प्रवाशांना मनाई करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र धावणार्या लालपरीची चाके थांबली होती. मात्र, राज्य शासनाच्या वतीने जिल्हा प्रवाशी वाहतूकीस एसटी महामंडळाला परवानगी देण्यात आली. तरीही किरपे येथे एसटी बस येत नसल्याने सरपंच, उपसरपंच, सदस्य, विद्यार्थी ग्रामस्थांनी एकत्रित येत गावात एसटी सुरू करण्यासाठी प्रयत्न केला. त्यासाठी मध्यंतरीच्या काळात किरपे ते लक्ष्मी नारायण मंदिर या मार्गावरील पाणंद रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. त्यानंतर एसटी बस सुरू झाली.
COMMENTS