कमी ड्रग्ज सापडलेल्यांना तुरुंगात टाकणे टाळा ; सामाजिक न्याय मंत्रालयाची एनडीपीएस कायद्यात सुधारणेची सूचना

Homeताज्या बातम्यादेश

कमी ड्रग्ज सापडलेल्यांना तुरुंगात टाकणे टाळा ; सामाजिक न्याय मंत्रालयाची एनडीपीएस कायद्यात सुधारणेची सूचना

नवी दिल्ली : महाराष्ट्रात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून

गांधींबाबत बुध्दीभेदाचे प्रयत्न हाणून पाडा : निरंजन टकले 
तोतया व्यक्ती उभी करून केले खरेदीखत
ओबीसी आरक्षण आणि राज्य सरकारची नाचक्की

नवी दिल्ली : महाराष्ट्रात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्रग्जप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आर्यन अटकेत असून, त्याचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने चार वेळेस फेटाळून लावला आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे एनडीपीएस कायद्यात सुधारणा करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्याचे पुनरावलोकन करण्याच्या सूचनेमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने तुरुंगवास टाळण्यासाठी अंमली पदार्थांचे सेवन करणारे आणि व्यसनी व्यक्तींकडे जास्त मानवीय दृष्टिकोन ठेवण्याची शिफारस केली आहे. मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी पाठवलेल्या सूचनेनुसार, वैयक्तिक वापरासाठी कमी प्रमाणात आढळणारे ड्रग्ज गुन्हेगारीपासून मुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यात एनडीपीएस कायद्यात सुधारणा सुचवल्या आहेत. जेणेकरून जे ड्रग्ज वापरतात किंवा त्यांच्यावर अवलंबून आहेत त्यांना व्यसनमुक्ती आणि पुनर्वसनासाठी पाठवले जावे, तुरुंगात टाकू नये. गेल्या महिन्यात महसूल विभाग, एनडीपीएस कायद्यासाठी केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरण, गृह मंत्रालय, आरोग्य मंत्रालय, सामाजिक न्याय आणि अधिकारिता, एनसीबी आणि सीबीआयसह अनेक मंत्रालये आणि विभागांकडून त्यांच्या आक्षेपांसह कायदा बदलण्यासाठी सूचना मागवण्यात आल्या होत्या. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या शिफारशींच्या आधारावर आपली सूचना केली आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ड्रग्जच्या वापरावर गुन्हेगारीकरण करणे केवळ प्रतिमा डागाळण्याचे काम करते आणि समस्या वाढवू शकते.

COMMENTS