कत्तलीसाठी जाणार्‍या 38 गाईंची सुटका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कत्तलीसाठी जाणार्‍या 38 गाईंची सुटका

महाराष्ट्र शासनाचे मनाई आदेश असताना गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी वाळकीहून नगरकडे घेवून जाणारा पिकअप टेम्पो नगर तालुका पोलिसांनी पकडला.

मराठा आरक्षणासाठी भातकुडगाव फाट्यावर उपोषण
शारदा शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात
चौकशी एजन्सीचा गैरवापर करत विरोधकांना झुकवण्याचे काम सुरू- मंत्री एस.निरंजन रेड्डी

अहमदनगर/प्रतिनिधी-महाराष्ट्र शासनाचे मनाई आदेश असताना गोवंशीय जनावरे कत्तलीसाठी वाळकीहून नगरकडे घेवून जाणारा पिकअप टेम्पो नगर तालुका पोलिसांनी पकडला. या कारवाईत 16 लाख 28 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून 38 गाईंची पोलिसांनी सुटका केली. याबाबतची अधिक माहिती अशी की घेऊन वाळकी येथून कत्तलीसाठी नगर येथे पिकअप टेम्पोमध्ये 6 गोवंशीय जनावरे आणली जात असल्याची माहिती नगर तालुक्याचे सपोनि राजेंद्र सानप यांना मिळाली. 

यावरून नगर तालुका पोलिसांनी छापा टाकून टेम्पोसह एकास ताब्यात घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव तोफिक शेख (राहणार वाळकी) असे सांगितले. अधिक चौकशीमध्ये वाळकी येथील धोंडेवाडी शिवारातील अकील कुरेशी यांच्या शेतातून ही जनावरे आणली असल्याचे सांगितले. तेथे अजून जनावरे असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून पोलिसांनी धोंडेवाडी येथे छापा टाकला असता तेथील शेतात झाडाझुडपात लपवून बांधून ठेवलेल्या 20 गाई आढळून आल्या तसेच मोसिन शेख कुरेशी याच्या प्लॉटवर बारा गाई दाटीवाटीने बांधून ठेवलेल्या आढळून आल्या. या सर्व गाई पोलिसांनी ताब्यात घेतल्या व माऊली कृपा गोशाळा येथे पाठवल्या. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शन व सूचनेवरून पोलीस उपनिरीक्षक धनराज जारवाल, पोलीस फौजदार रितेश राऊत, पोलीस हवालदार अबनावे, चालक पोलीस हवालदार पालवे, पोलीस नाईक मरकड, खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल भालसिंग, तोरडमल यांनी केली.

COMMENTS