औरंगाबादेत पावसाचा हाहाकार… जोरदार पावसाने झोडपले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औरंगाबादेत पावसाचा हाहाकार… जोरदार पावसाने झोडपले

प्रतिनिधी : औरंगाबादकाल संध्याकाळी औरंगाबाद शहरावर रात्री ७:१० ला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुढील दोन तीन मिनीटात, म्हणजे ७:१२ वाजण्याच्या दरम्या

राज्यात जातीनिहाय जनगणना करा
बैलांना आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या काका आणि पुतण्याचा मृत्यू
मराठवाड्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्येत वाढ

प्रतिनिधी : औरंगाबाद
काल संध्याकाळी औरंगाबाद शहरावर रात्री ७:१० ला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुढील दोन तीन मिनीटात, म्हणजे ७:१२ वाजण्याच्या दरम्यान अतिशय रौद्ररूप धारण केले.

८:१० या एका तासाच्या कालावधीत ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस झाल्याने शहरात पावसाचा हाहाकार पाहावयास मिळाला.

सुरुवातीच्या तीस मिनिटाच्या काळात (७:४० पर्यंत) पाऊस पड़ण्याचा सरासरी वेग हा १६६.७५ मीमी हा नोंदला गेला व या तीस मिनिटांच्या कालावधीत ५६.२ मी.मी पावसाची नोंद झाली.

म्हणजेच औरंगाबाद शहरावर ढगफुटीपेक्षा वेगाने झोडपून काढले. (ताशी शंभर मी. मी. किंवा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी म्हंटली जाते)

रात्री ७:४० नंतर पावसाच वेग थोडा कमी होत गेला, ०७:५० पर्यंत सरासरी ८६.९ मी मी वेग होता.

नंतर ८:१० पर्यंत तो कमी होत ५३.२४ मीमी प्रति तास पावसाचा वेग राहिला. तर सायंकाळी ७:१० ते ८:१० या एका तासात ८७.६ मी. मी. औरंगाबाद शहरात पावसाची नोंद झाली

COMMENTS