औंध कोव्हिड सेंटरसाठी मनसेचा पाठपुरावा; प्रशासनाने दिले सुरू करण्याचे आदेश

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

औंध कोव्हिड सेंटरसाठी मनसेचा पाठपुरावा; प्रशासनाने दिले सुरू करण्याचे आदेश

खटाव तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तालुक्यातील बंद कोव्हिड सेंटर तातडीने सुरू करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे केली.

खटल्यांचे निकाल राखून ठेवणे चिंताजनक
राजकीय भूमिकेतील ईव्हीएम !
अमोल मिटकरी यांचा डॉ. रणजित पाटील यांना टोला

वडूज / प्रतिनिधी : खटाव तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तालुक्यातील बंद कोव्हिड सेंटर तातडीने सुरू करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाकडे केली. मनसेच्या पदाधिकार्‍यांनी याबाबतचा पाठपुरावा केल्यानंतर वडूज व औंध याठिकाणचे कोव्हिड सेंटर सुरू करण्याबाबत प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी सुचना दिल्या. 

याबाबत अधिक माहिती अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा रोजगार स्वयंरोजगारचे जिल्हा संघटक सूरज लोहार हे अंबवडे (ता. खटाव) येथील एका कोरोना बाधित पुरुषावर उपचार करण्यासाठी मायणी येथे घेऊन गेले होते. मात्र त्याठिकाणी बेडची संख्या व तालुक्यातील वाढत्या रूग्णांची संख्या लक्षात घेता वडूजमध्ये कोरोना सेंटर का सुरू होत नाही? याबाबत आरोग्य विभागाकडे विचारणा केली. त्यानंतर लोहार यांनी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील याना संपर्क साधत खटाव तालुक्यात कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी वडूज येथील कोव्हिड सेंटर सुरू करण्याबाबतची मागणी केली. 

त्यानंतर मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांचेशी तातडीने संपर्क साधत खटाव तालुक्यात कोरोना सेंटर त्वरित सुरू करून रुग्णांना उपचार मिळावेत, अशी मागणी केली. त्यानंतर प्रांताधिकारी सूर्यवंशी यांनी तातडीने वडूज व औंध याठिकाणी कोव्हिड सेंटर सुरू करण्याच्या सूचना आरोग्य अधिकार्‍यांना दिल्या. सूरज लोहार यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या निदर्शनास आणल्याने खटाव तालुक्यातील वडूज व औंध येथे कोरोना बाधित रूग्णांवर उपचार होण्यास मदत झाली आहे. 

आरोग्य अधिकार्‍यांना सूचना : प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी 

खटाव तालुक्यातील वडूज, औंध येथे कोरोना सेंटर सुरू करण्याबाबत आरोग्य अधिकार्‍यांना सूचना दिल्या आहेत. 

उद्यापासूनच याठिकाणी हे सेंटर सुरू होईल, तसेच याबाबत त्याठिकाणी स्टाफ संदर्भात चर्चाही झाली असल्याचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी सांगितले. 

——  

सूरज लोहार यांची सतर्कता

खटाव तालुक्यात मायणी कोरोना सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. मात्र, तालुक्यात रुग्णाच्या संख्येत वाढ झाल्याने याठिकाणी बेड कमी पडू लागल्याने वडूज येथे कोरोना सेंटर उभे राहावे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा रोजगार स्वयंरोजगार संघटनेचे जिल्हा संघटक सूरज लोहार यांनी सतर्कता दाखवत वरिष्ठांना ही गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्याने आता खटाव तालुक्यातील वडूज, औंध याठिकाणी कोरोना सेंटर पुन्हा नव्याने सुरू होणार आहे. तालुक्यातील कोरोना परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लोहार यांनी दाखविलेली सतर्कता महत्वाची ठरली आहे.

COMMENTS