ओबीसी आरक्षणासाठी लढणार्‍यांना धमक्या ; मंत्री वडेट्टीवार यांचा आरोप

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओबीसी आरक्षणासाठी लढणार्‍यांना धमक्या ; मंत्री वडेट्टीवार यांचा आरोप

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून वाद पेटला आहे. अशातच आरक्षणासाठी लढणार्‍यांना जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलवर व्हिडीओ पाठवून धमकी देत असल्याचा धक्कादायक आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 

पुनीत कुमारचा शेवटचा चित्रपट झाला प्रदर्शित | LokNews24
कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी विश्‍वास नांगरे पाटलांची होणार चौकशी
केएल राहुल आशिया कपच्या दोन सामन्यांमधून बाहेर

अमरावती / प्रतिनिधीः ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून वाद पेटला आहे. अशातच आरक्षणासाठी लढणार्‍यांना जीवे मारण्याची धमकी मिळत असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलवर व्हिडीओ पाठवून धमकी देत असल्याचा धक्कादायक आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. 

    स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. ते म्हणाले, की काही जण ओबीसी आरक्षणासाठी लढा देणार्‍या नेत्यांना धमकी देत आहे. कोल्हापूरचे पाटील आहे, त्यांनी मारण्याची धमकी दिली आहे. मला, छगन भुजबळ, यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांना फेसबुकवर व्हिडीओ टाकून टॅग केले जात आहे, तुम्हाला आम्ही मारू, ठोकून काढू अशा धमक्या देत आहे; पण अशा धमक्यांमुळे प्रश्‍न थोडाच सुटणार आहे. लवकरच धमकी देणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असून त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई करणार असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. आरक्षणाचा प्रश्‍न धमकीने सुटणार नाही तर चर्चेने सुटणार आहे. धमकी न देता चर्चा करून प्रश्‍न सोडवावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे. ’मुळात मुख्य मुद्दा असा आहे, की मराठा समाजासाठी संभाजीराजे आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर जर दोन नेते एकत्र येत असतील तर स्वागताची बाब आहे; पण जर राजकीय दृष्टीने जर कुणाला फायदा होणार असेल तर दोन्ही नेत्यांनी याबद्दल सावध भूमिका घेतली पाहिजे’, असे वडेट्टीवार म्हणाले. त्याचबरोबर, मागासवर्गीयांना पदोन्नतीतील आरक्षण हे 2017 मध्ये फडणवीस सरकारने रद्द केले. ओबीसीचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले असले तरी आम्ही त्यासाठी न्यायालयीन लढाई लढू, असे ते म्हणाले.

COMMENTS