प्रतिनिधी : मुंबई महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण (OBC Reservation) देणाऱ्या राज्य सरकारच्या सुधारित अध्यादेशावर र
प्रतिनिधी : मुंबई
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण (OBC Reservation) देणाऱ्या राज्य सरकारच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांनी अखेर स्वाक्षरी केली.
त्यामुळे आगामी महानगरपालिका, नगर पालिका, पंचायत समित्या, नगर पंचायती, जिल्हा परिषदा यांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यपाल कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी अध्यादेशावर सही केल्यानंतर आता त्याचं कायद्यात रुपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, राज्य सरकारने हा अध्यादेश यापूर्वीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सहीसाठी पाठवला होता. मात्र राज्यपालांनी काही सुधारणा सुचवल्या होत्या.
ओबीसींना आरक्षण देताना एकूण आरक्षणाचे प्रमाण हे ५० टक्क्यांच्या वर जाणार नाही, अशी तरतूद या अध्यादेशात करण्याची सूचना राज्यपालांनी केली होती.
त्यानंतर राज्य सरकारने सुधारित अध्यादेश पुन्हा राज्यपालांकडे पाठवला होता. अखेर आज राज्यपाल कोश्यारी यांनी या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे.
COMMENTS