ऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर खाजगी हॉस्पिटलच्या कोविड रुग्णालयात रुपांतरास परवानगी : रामचंद्र शिंदे

Homeमहाराष्ट्रसातारा

ऑक्सिजनच्या उपलब्धतेनंतर खाजगी हॉस्पिटलच्या कोविड रुग्णालयात रुपांतरास परवानगी : रामचंद्र शिंदे

सातारा जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये मिळून एकूण 82 हॉस्पिटलमध्ये आज रोजी 16 हजार 626 इतके कोरोन संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत.

चुनाभट्टीत रस्ता खचला दुचाकी आणि चारचाकी वाहने पडली खड्यात
नाशिकमध्ये साथीचे आजार
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या बाईला तुम्ही शिवसेनेत स्थान दिलं हे दुर्दैवी 

सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालये मिळून एकूण 82 हॉस्पिटलमध्ये आज रोजी 16 हजार 626 इतके कोरोन संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी 12 हजार 447 रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. एकूण 82 हॉस्पिटल पैकी 58 खाजगी हॉस्पिटलना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यात एकूण 20 खाजगी हॉस्पिटल प्रशासनाने त्यांच्याकडील सुरु असलेले हॉस्पिटल हे कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्याबाबतचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंजूरीसाठी सादर केले आहेत. तथापि, ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे या खाजगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करुन मंजूरी देणे उचित ठरणार नाही. परंतू, भाविष्यात ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शनची आवश्यकतेनुसार उपलब्धता झाल्यास या सर्व 20 खाजगी हॉस्पिटल्सना कोविड हॉस्पिटलमध्ये रुपांतरीत करण्याबाबत तात्काळी मंजूरी देण्यात येईल असे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी कळविले आहे.

सद्य:स्थितीत सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात दैनंदिन लागणार्‍या ऑक्सिजनपेक्षा कमी ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. तसेच अत्यावश्यक रुग्णांना उपचाराकरीता आवश्यक असणारे रेमडिसीवर इंजेक्शनसुध्दा  कमी प्रमाणात उपलब्ध होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनामार्फत वरिष्ठ कार्यालय आणि शासनस्तरावर ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शन उपलब्ध होण्याकरीता युध्द पातळीवर पाठपुरावा करण्यात येत आहे. लवकच सातारा जिल्ह्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन आणि रेमडिसीवर इंजेक्शन्स उपलब्ध होतील, असेही, शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. 

COMMENTS