एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहू मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन

शेवगाव तालुका प्रतिनिधी दिनांक 3 राज्य परिवहन आगाराचे बस चालक दिलीप काकडे यांनी केलेली आत्महत्या ही दुदैवी घटना आहे. काकडे कुटुंबावर या घटनेने मोठ

शेतकर्‍यांच्या फायद्यासाठी नाफेड कांदा खरेदी केंद्र सुरू ः आ. रोहित पवार
हातचलाखीने बदलले कार्ड, खात्यातून काढले 43 हजार
मोबाईलवर ‘वे टू भूर्र’ स्टेटस ठेवणे…पडले महागात

शेवगाव तालुका प्रतिनिधी दिनांक 3

राज्य परिवहन आगाराचे बस चालक दिलीप काकडे यांनी केलेली आत्महत्या ही दुदैवी घटना आहे. काकडे कुटुंबावर या घटनेने मोठा आघात झाला असून त्यांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. काकडे यांच्या आत्महत्येप्रकरणी परिवहन मंत्र्यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मनसेचे नेते दिलीप (बापू) धोत्रे यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्य परिवहनचे कर्मचारी बसचालक दिलीप काकडे यांनी नुकतीच आत्महत्या केली. दरम्यान मनसेचे दिलीप धोत्रे व राज्य प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आव्हाणे येथे जावून मयत कर्मचारी काकडे यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले. तत्पुर्वी शेवगाव येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.

यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, संभाजीनगर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर, शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे, पाथर्डी तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, अविनाश पालवे, मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रविण शिरसाठ, उपजिल्हाध्यक्ष गोकुळ भागवत, रस्ते आस्थापना विभागाचे शेवगाव तालुकाध्यक्ष सागर आधाट, गणेश डोमकावळे, ज्ञानेश्वर कुसळकर, उपतालुकाध्यक्ष रामेश्वर बलिया आदी उपस्थित होते.

COMMENTS