एसटीला सीएनजी किंवा ई-बसच्या पर्यायाचा अवलंब करा – अजित पवार

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटीला सीएनजी किंवा ई-बसच्या पर्यायाचा अवलंब करा – अजित पवार

पुणे- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी (एसटी) यापुढे डिझेल बसची खरेदी करू नका. सीएनजी किंवा ई-बसच्या पर्यायाचा अवलंब करा,' अशी सूचना एसटीला

राजकीय कटूता संपणार का ?
मुख्यमंत्र्यांनी शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले; उध्दव ठाकरे यांचा आरोप
आदिवासी समाजाने आपले हक्क जाणून घ्यावे

पुणे- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासाठी (एसटी) यापुढे डिझेल बसची खरेदी करू नका. सीएनजी किंवा ई-बसच्या पर्यायाचा अवलंब करा,’ अशी सूचना एसटीला केली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोथरूड येथे एका ई-बाइक शोरूमचे पवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक दीपक मानकर उपस्थित होते. सार्वजनिक वाहतुकीत ई-वाहनांचा अधिकाधिक वापर करण्याची योजना आहे. पीएमपीच्या ताफ्यात ई-बसची संख्या वाढविण्यात येत आहे. तसेच, एसटीच्या ताफ्यात नव्याने डिझेल बस खरेदी करू नये, असे त्यांना सांगितले आहे. त्याऐवजी सीएनजी किंवा ई-बस घेण्याची सूचना त्यांना केली आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

‘पेट्रोल-डिझेलच्या दरात अफाट वाढ झाली आहे. हा इंधनाचा साठा कधी तरी संपणार आहे. वैश्वित तापमानवाढीची समस्याही कायम आहे. त्यामुळे काळाची गरज ओळखून, आपल्याला आता पर्याय शोधावे लागणार आहे. त्यामुळे इथेनॉल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्राधान्य द्यावे लागणार आहे,’ असेही पवार म्हणाले.

COMMENTS