एमपीएससी मायाजाल; विद्यार्थ्याची आत्महत्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एमपीएससी मायाजाल; विद्यार्थ्याची आत्महत्या

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुरसुंगी

सरकारचा अधिवेशनातून पळ काढण्याचा डाव !
स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येचे राज्यभरात पडसाद
एमपीएससीच्या रिक्त जागा 31 जुलैपर्यंत भरणार : अजित पवार

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. फुरसुंगी जवळील गंगानगर येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली. स्वप्नील सुनील लोणकर (वय २४, रा. फुरसुंगी), असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्याएमपीएससीच्या विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्यागळफास घेऊन केली आत्महत्यास्वप्नीलचे वडील सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत प्रिटींग प्रेसचा व्यवसाय आहे. स्वप्नीलने स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी संपादन केली होती. त्याचे आई-वडील शनिवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडेचार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्नीलने त्याच्या खोलीत गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात हलविले, तेथे डॉक्‍टरांनी त्यास मृत घोषित केले.एमपीएसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्याएमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नकास्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे म्हटले आहे. स्वप्नीलचे शिक्षण पूर्ण झाल्यापासून तो एमपीएससीच्या परिक्षेची तयारी करीत होता. तो २०१९ च्या पूर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण झाला होता. मात्र, गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे त्यांची मुलाखत झाली नव्हती. त्याबरोबर त्याने २०२० मध्येही एमपीएससीची परिक्षा दिली होती. त्यातील पूर्व परिक्षा तो उत्तीर्ण झाला होता. वाढते वय आणि नोकरी करुनही कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या व इतरांच्या वाढत्या अपेक्षा या सगळ्या तणावातून त्याने आत्महत्या केल्याचे त्याच्या सुसाईड नोटवरुन दिसून येत आहे.मन हेलावून टाकणारं पत्र कोरोना नसता तर सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. हवे ते ठरवून साध्यही करता आले असते. आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगल असतं. हवं ते, ठरवलं ते प्रत्येक साध्य झालं असतं. घरची एकंदरीत परिस्थिती, परीक्षा निघणार या आशेवर घेतलेलं कर्ज, खासगी नोकरी करून कधी ही न फिटू शकणारा कर्जाचा डोंगर, घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना! मी खचलो मुळीच नाही, फक्‍त मी कमी पडलो. माझ्याकडे वेळ नव्हता! एमपीएससीच्या मायाजालात पडू नका, ‘जमलं तर हे इतरांपर्यंत पोहोचवा, अनेक जीव वाचतील,’ अशा शब्दात स्वप्नीलने स्पर्धा परीक्षांबाबत मन हेलावून टाकणार पत्र लिहिलं आहे.

COMMENTS