‘एनसीबी’ने केली अनन्या पांडेची चौकशी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘एनसीबी’ने केली अनन्या पांडेची चौकशी

मुंबई- ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने गुरूवा

राज्यात स्वत:च्या जागेत विभागीय व जिल्हा माहिती कार्यालये, माहिती भवन उभारणार
Sangali : छत्रपती शिवाजी चौकात व्यसनी तरुणांनी केली दगडफेक
पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींचे विचार समाजाला प्रेरणादायी

मुंबई- ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबीने गुरूवारी विविध ठिकाणी छापेमारी केली. शाहरूख खानच्या मन्नत बंगल्यावर एनसीबीने नोटीस देत, आर्यनचे इॅलेक्ट्रोनिक डिव्हाईस तपासण्यासाठी मागणी केली असून, अभिनेत्री अनन्या पांडे हिला समन्स बजावत, तिची दुपारी चौकशी केली. एनसीबीच्या या कारवाईने बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.


एनसीबीच्या कार्यालयात अनन्यासोबत तिचे वडील अभिनेता चंकी पांडेदेखील कार्यालयात होते. या चौकशीदरम्यान आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे चंकी पांडे तसेच अनन्याच्या परिवाराने सांगितले. गरजेची सर्व माहिती आपण एनसीबीला पुरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनन्या पांडेसोबत ड्रग्ज चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहाना खानचे नावही समोर आले आहे. अनन्या पांडेच्या घराची झडती घेतल्यानंतर एनसीबीची एक टीम शाहरुख खानच्या मन्नतच्या घरी पोहोचली. एनसीबीने बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला आहे. मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, पण असे मानले जाते की एनसीबीचा हा छापा आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित असू शकतो. अनन्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानची मैत्रीण आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारी व्ही. व्ही. सिंह यांच्या नेतृत्वाखाली शोधमोहिम राबवण्यात येत आहे. एनसीबीने बुधवारी आर्यन खान आणि उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्रीचे ड्रग्ज चॅट कोर्टात सादर केले होते. त्यामध्ये ड्रग्जबद्दल चर्चा झाली होती. या चॅटच्या आधारे एनसीबीने न्यायालयाकडे आर्यनसह उर्वरित आरोपींच्या रिमांडची मागणी केली आहे. अनन्या बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. अनन्याने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

शाहरुखने कारागृहात घेतली आर्यनची भेट
आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर वकिलांनी उच्च न्यायालयात जामिनीसाठी धाव घेतली असतांनाच, शाहरूख खानने आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात भेट घेतली. गुरूवारी अचानक सकाळी 9 वाजता शाहरुख खान साध्या कारने आर्थर रोड तुरुंगाबाहेर पोहोचला. यावेळी त्याच्यासोबत पत्नी गौरी किंवा मुलगी नव्हती. फक्त खासगी सुरक्षारक्षक त्याच्यासोबत होते. यानंतर नातेवाईकांना आत जाण्याची परवानगी आहे त्या गेटमधून शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी गेला. शाहरुख खानने आर्यनला भेटण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन पोहोचला होता. जवळपास 15 ते 20 मिनिटांच्या भेटीनंतर शाहरुख खान तेथून रवाना झाला.

अनन्या पांडेच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू एनसीबीच्या ताब्यात
एनसीबच्या टीमने गुरुवारी मुंबईतील अनन्या पांडेच्या घरावर छापा टाकला. तपास संस्थेने अनन्या पांडेला समन्स बजावले आहे. तिला आजच दुपारी 2 वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एनसीबीने हे स्पष्ट केले नाही की, अनन्याला आरोपी म्हणून बोलावले की प्रत्यक्षदर्शी म्हणून चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. एनसीबीच्या टीमने अनन्याच्या घरातून फोन, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. एनसीबीने या वस्तू त्यांच्यासोबत घेतल्या आहेत.

COMMENTS