उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मीती करणारा कोल्हे कारखाना राज्यातील पहिला : बिपीनदादा कोल्हे

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मीती करणारा कोल्हे कारखाना राज्यातील पहिला : बिपीनदादा कोल्हे

लढवैय्ये माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे समर्थ मार्गदर्शन

सावकाराने लुबाडलेले ६० लाखांचे घर व जमीन पोलीस निरीक्षकांमुळे मिळाले परत
देवळाली प्रवरा येथे आदिवासी सन्मान मेळावा उत्साहात
वाळूतस्करीचे शूटिंग करणार्‍यास मारहाण करून खुनाची धमकी

 कोपरगाव शहर प्रतिनिधी  :

लढवैय्ये माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे समर्थ मार्गदर्शन, सभासद शेतकरी कामगारांची साथ, व्यवस्थापन संचालक मंडळाचे धोरणात्मक निर्णयातुन सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांने पॅरासिटामॉल औषधनिर्माण शास्त्र फार्मा डिव्हीजन मध्ये नेत्रदिपक पावले टाकुन अद्यावत संशोधन प्रयोगशाळेची निर्मीती केली असुन सहा वर्षात कोल्हे कारखाना आत्मनिर्भर भारत संकल्पनेत देशातील सहकारी तत्वावरील पहिल्या दहा कारखान्यांमध्ये सर्वोच्च स्थानी राहिल असा विश्वास संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी व्यक्त केला.  उसाच्या रसापासुन इथेनॉल निर्मीती करणारा कोल्हे कारखाना राज्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असल्याचा पुर्नउच्चारही कोल्हे यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी देशातील साखर कारखानदारीसाठी इथेनॉल निर्मीती व खरेदी धोरण घेवुन चांगल्या प्रकारे मदत केली त्याच धर्तीवर यंदाचे हंगामात बंपर साखर उत्पादन होणार असल्यांने राज्य शासनांने देखील मोठे पॅकेज देवुन सहकारी साखर कारखानदारी वाचवावी अशी मागणी बिपीनदादा कोल्हे यांनी यावेळी बोलतांना केली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबददल यावेळी युवानेते विवेकदादा कोल्हे यांचा संचालक मंडळाने सत्कार केला.

सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांची ५८ वी अधिमंडळाची वार्षीक सर्वसाधारण सभा इतिहासात पहिल्यांदाच कोरोना नियम पाळून कारखाना कार्यस्थळावर शनिवारी २८ मार्च रोजी ऑनलाईन पध्दतींने पार पडली.  त्यात २२०० सभासद ऑनलाईन जोडले गेले होते.  प्रारंभी प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र सुर्यवंशी व सर्व संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले. अहवाल विषय पत्रिकेवरील सर्व चौदा विषयांना सभासदांनी रितसर सुचना व अनुमोदन देवुन टाळयांच्या गजरात त्यास मंजुरी दिली.  मागील सभेचे अहवाल वाचन सचिव तुळशीराम कानवडे यांनी केले.  अहवालसालात दिवंगत झालेल्या सभासद हितचिंतकांना उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी श्रध्दांजली वाहिली.

अहवाल सालात सदाशिव माधव बोठे (आडसाली-करंजी), वाळीबा रघुनाथ सांगळे (पुर्वहंगामी सत्यगांव), सौ मंगल रमेश गांगुर्डे (सुरू-तळेगांवमळे), व सौ कुसुमबाई साहेबराव जाधव (खोडवा-तळेगांवमळे) या सर्वाधिक उस उत्पादन घेणां-या सभासदांचा उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे व त्यांच्या संचालक सहका-यांनी थेट घरी जाउन सत्कार केला.

श्री. बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणांले की, सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांला संघर्ष नविन नाही. अनेक संकटावर यशस्वी मात करत कारखान्यांने यशस्वीरित्या गाळप केले आहे.  सर्व संचालक मंडळाची साथ व युवानेते विवेक कोल्हे यांच्या कार्यकुशलतेतुन कोल्हे कारखान्यांने अतिशय कमी खर्चात दैनंदिन गाळप क्षमता वाढवुन ती चालु हंगामात प्रतिदिन साडेचार ते पाच हजार मे. टनापर्यंत वाढविली आहे., पुढच्यावर्षीही त्यात आणखी वाढ करण्यांचा मनोदय आहे. कारखान्यांचे सर्व सभासद शेतकरी-कर्मचारी, व्यवस्थापन, आदिंच्या सहकार्याने गाळपाचे आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढुन माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसदिनी एकाच दिवशी पावणेसहा हजार मे टन उसाचे गाळप करीत संजीवनीने नेत्रदिपक पाउल टाकले आहे. चालु गळीत हंगामात एप्रिलच्या तिस-या आठवडयापर्यंत संजीवनी ८ लाख मे टन उसाचे गाळप पुर्ण करेल.  यंदा साखरेचे उत्पादन मोठे होणार असल्यांने केंद्र शासनांने त्यानुरूप धोरणे घेवुन सी, बी, हेवी, ज्युस इथेनॉल निर्मीती-खरेदी पाच वर्षासाठी निश्तिच केली आहे.   कोरोनाची आपत्ती मोठी आहे त्यात सहकारमहर्षि कोल्हे कारखान्यांला जे जे शक्य होईल ती ती मदत देण्यांचा गेल्या वर्षभरात प्रयत्न केला आहे व कोवीड १९ लस सभासद कामगारांसाठी मोफत देण्यांचा निर्णयही राज्यात सर्वप्रथम घेतला आहे.  खुल्या अर्थव्यवस्थेत तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव शासनांने गॅट करारावर स्वाक्षरी केल्यांने व चायना येथुन अल्प किंमतीत रसायने आयात होवु लागल्यांने संजीवनीत तयार होणां-या रासायनीक व औषधी उत्पादनांवर गदा आली सर्व प्रकल्प बंद पडले अशाही परिस्थितीत हिंमत न हारता हे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू करण्यांत व्यवस्थापनांने यश मिळविले आहे.  कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात उसाचे उत्पादन वाढले पाहिजे यासाठी सभासद शेतक-यांना थेट कोईमतुर येथील फाउंडेशन उसबेणे आणून त्याचे लागवडीसाठी वाटपही केले आहे.८६०३२,१०००१,८००५,१४०९   या अधिक उस उत्पादन देणां-या बेण्यांची शेतक-यांनी लागवड करावी.  रॉ शुगरची निर्यातही आपल्या कारखान्यांने केली आहे.

कोपरगांव कार्यक्षेत्रात यंदा चांगले पर्जन्यमान झाले, धरणांत पुर्ण क्षमतेने पाणी असुनही लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कालवा सल्लागार समितीत ठरलेली रब्बी उन्हाळ पाण्यांची आर्वतने गोदावरी कालव्यांना मिळाली नाही, विहीरीत पाणी असुनही वीज तोडल्यामुळे शेतक-यांना पिकांना वेळेवर पाणी देता आले नाही परिणामी शेतक-यांचे कोटयावधीचे नुकसान झाले, पाटपाणी नियोजनाचे तीनतेरा वाजले याला जबाबदार कोण.  शेतकरी हितासाठी आघाडी करता मग शेतक-यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असतांना दुटप्पी भूमिका का घेता असा सवाल उपस्थित करून चाळीस वर्षात साखर उद्योगावर कोसळलेल्या संकटाचा समर्थपणे मुकाबला करून सभासद शेतक-यांच्या प्रगतीसाठी काम करतो असे बिपीनदादा कोल्हे यांनी शेवटी सांगितले.  उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे यांनी आभार मानले.

सहकार मोडकळीस

स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आदि मंडळींनी सहकाराचा समर्थ पाया रोवला.  एकेकाळी खाजगी साखर उद्योगाशी दोन हात करत सहकारी साखर कारखानदारीने राज्याला प्रगतीपथावर नेण्यांचा प्रयत्न केला पण आज त्याच सहकारासमोर खाजगीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे त्यात सहकार मोडकळीस येईल तेंव्हा राजकीय जोडे बाजुला ठेवुन सर्वांनी आत्मचिंतन करून या उद्योगाला वाचविण्यांसाठी पुढे यावे असे आवाहन बिपीनदादा कोल्हे यांनी के

COMMENTS