उसाच्या नर्सरीतून महिला लखोपती

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उसाच्या नर्सरीतून महिला लखोपती

टाळेबंदीच्या वेळी नोकरीवर संकट असताना, ऊस विभागाच्या पुढाकाराने मात्र ग्रामीण भागातील महिलांच्या समूहाला उत्पन्नाची नवी संधी उपलब्ध झाली आहे.

शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
ज्वेलर्सवर भरदिवसा दरोडा 20 कोटीचे दागिने पळवले
व्यापार्‍याच्या मुलाच्या अपहरणात चौघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

मिरतः टाळेबंदीच्या वेळी नोकरीवर संकट असताना, ऊस विभागाच्या पुढाकाराने मात्र ग्रामीण भागातील महिलांच्या समूहाला उत्पन्नाची नवी संधी उपलब्ध झाली आहे. उसाची उत्पादकता व गुणवत्ता वाढविण्यासाठी पेरणीची पारंपारिक पद्धत बदलली जात असून नर्सरीमध्ये रोपे तयार करण्यावर भर दिला जात आहे. 

या कामाची जबाबदारी महिलांना देण्यात आली आहे. याचा दुहेरी फायदा झाला. ऊस उत्पादनात वाढ झाल्याने ग्रामीण महिलांना स्वावलंबी होण्याची संधी मिळाली. महिलांच्या गटाने 65 लाखांची कमाई केली. मिरतचे जिल्हा ऊस अधिकारी डॉ. दुष्यंत कुमार म्हणाले, की ऊस विभागाच्या पुढाकाराने मिरत जिल्ह्यात महिलांचे 130 गट तयार करण्यात आले. प्रत्येक गटात सरासरी 20 महिला सहभागी झाल्या. सप्टेंबर 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीत 50 गटांनी सुमारे 65 लाखांची कमाई केली आहे. एका गटाला सरासरी एक लाख तीस हजार रुपयांचे उत्पन्न झाले. ऊस विकास परिषदेने आपल्या बजेटमध्ये तरतूद केली. ऊस लागवडीसाठी प्रतिरोप 3.50 रुपयांचे अनुदान दिले जाते. त्यापैकी 1.50 रुपये ऊस विकास परिषदेला प्रोत्साहनपर तर उर्वरित महिला गटाला खरेदीच्या वेळी देण्यात येतात. यामुळे महिलांचे उत्पन्न आणि चांगल्या उसाचे  उत्पादन होते. 

COMMENTS