उसने पैसे मागितले म्हणून महिलेचा खून

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उसने पैसे मागितले म्हणून महिलेचा खून

हा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मंगल पांडुरंग गुरव (वय 46, रा. नेर्ले, ता. ऊाळवा) यांचा खून झाला असून हा खून अनैतिक संबंधातून केलेल्या 50 हजार रुपयांच्या मागणीतून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

वैनगंगा नदीत 6 महिल्या बुडाल्या
हृदय विकाराच्या धक्क्याने 23 वर्षाच्या पैलवानाचा कोल्हापूरात मृत्यू
त्या दोन एनसीबीच्या अधिकार्‍यांची बडतर्फी

इस्लामपूर / प्रतिनिधी : दहा दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या मंगल पांडुरंग गुरव (वय 46, रा. नेर्ले, ता. ऊाळवा) यांचा खून झाला असून हा खून अनैतिक संबंधातून केलेल्या 50 हजार रुपयांच्या मागणीतून झाला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. मंगल गुरव यांचा मृतदेह 2 दिवसांपूर्वी बहे गावच्या हद्दीतील पेठ ओढ्याच्या पात्रात कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. खूनप्रकरणी अशोक पांडुरंग डेळेकर (वय 46, रा. कापुसखेड, ता. वाळवा) याला इस्लामपूर पोलिसांनी अटक केली आहे. मंगल गुरव यांनी मागितलेल्या 50 हजार रुपयांच्या रकमेवरून डेळेकर याने खून केला असल्याची कबुली दिली. उपविभागीय पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सपोनि अनिल जाधव उपस्थित होते.

पिंगळे म्हणाले, मंगल गुरव ह्या 2 एप्रिल रोजी तासाभरात येते म्हणून घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्यांचा मुलगा अक्षय गुरव याने 5 एप्रिल 21 रोजी कासेगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. 9 एप्रिलला बहे गावच्या हद्दीत अनोळखी महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला होता. अक्षय गुरव याने दिलेल्या तक्रारीनुसार ही महिला तीच असल्याची ओळख पटली होती. 9 एप्रिलला दुपारी 12 वाजता मृतदेह आढळून आला. त्यानंतर शवविच्छेदन अहवालात या महिलेच्या डोक्याच्या उजव्या बाजूला कपाळावर व कवटीचे हाड व दात तुटला असून गळा आवळून गंभीर जखम असल्याचे आढळून आले. यात घातपात झाल्याचा संशय आल्याने त्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरू लागली.

यानंतर इस्लामपूर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान मृतदेह मिळालेली जागा व परिस्थिती यावरून संपर्कातील व्यक्तीने घातपात केल्याचा संशय पोलिसांना आला होता. त्या अनुषंगाने मंगल गुरव यांचे फोन कॉल तपासणी केल्यानंतर कापुसखेड गावातील अशोक पांडुरंग डेळेकर याच्याशी त्यांचे वारंवार फोन कॉल झाले असल्याचे निष्पन्न झाले. डेळेकर याच्याशी या महिलेचे अनैतिक संबंध असल्याचे समजले. त्या दोघांमध्ये झालेल्या फोनवरील संपर्काच्या आधारावर कसून चौकशी केली असता डेळेकर यानेच 50 हजार रुपयांच्या मागणी केल्याच्या कारणावरून मंगल गुरव यांचा खून केला असल्याची कबुली दिली.

नेर्ले आणि बहे गावच्या वेशीवर असलेल्या निर्जन ठिकाणी एका ओढ्याच्या शेजारी हे दोघे गेले होते. त्या ठिकाणी मंगल गुरव यांनी डेळेकरकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. डेळेकर कर्जबाजारी असल्याने पैसे देण्यास टाळाटाळ करत असावा. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. त्याने रागाच्या भरात शेजारील दगड उचलून तिच्या डोक्यात घातला. यात ती जागीच ठार झाली. त्यानंतर मंगल गुरव हिच्या कडील ओढणी गळ्यात बांधून तिला सुमारे पन्नास फूट अंतरावर फरफटत नेऊन तिचा मृतदेह बहे गावच्या हद्दीत पेठ ओढ्याच्या पात्रात पाण्यात टाकून दिला. पोलिसांना सुगावा लागताच ते त्याच्या घरी गेले. तेंव्हा हा आजारी अवस्थेत घरात झोपून होता. जणू काही झालेच नाही, अशा आवेशात पोलिसांना उत्तरे देत होता. पोलीसी खाक्या दाखवताच त्याने कबुली दिली.

उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल जाधव, प्रवीण साळुंखे, दीपक ठोंबरे, शरद जाधव, अरुण पाटील, शरद, बावडेकर, आलमगीर लतीफ, भरत खोडकर, किरण मुदूर, अमोल सावंत, सचिन सुतार, आनंदा देसाई, शशिकांत माने, विनय माळी, कॅप्टन गुंडेवाड यांच्या पथकाने खुनाचा छडा लावला.

COMMENTS