Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उरमोडीच्या पाण्यासाठी भाऊसाहेबांनी खर्च केली आमदारकीची 20 वर्षे : जि. प. सदस्य सुरेंद्र गुदगे

दुष्काळी भागातील शेती उरमोडीच्या पाण्याने ओलिताखाली आणून हजारो एकर क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न दिवंगत माजी मंत्री भाऊसाहेब गुदगे यांनी पाहिले होते.

राहुरीतील शिंदे गटाच्या 28 पदाधिकार्‍यांचे सामुहिक राजीनामे
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट
साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देवून गौरविण्यात यावे – मदन हातागळे,साईनाथ अडागळे

कलेढोण / प्रतिनिधी : दुष्काळी भागातील शेती उरमोडीच्या पाण्याने ओलिताखाली आणून हजारो एकर क्षेत्र सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न दिवंगत माजी मंत्री भाऊसाहेब गुदगे यांनी पाहिले होते. त्यासाठी आपल्या आमदारकीच्या 20 वर्षांची ताकद त्यांनी खर्च केली असल्याचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी सांगितले.

तारळी प्रकल्पाच्या नूतन पाणी वापर संस्था हस्तांतरणावेळी ते बोलत होते. त्यावेळी पाणी वितरक संस्था प्रशिक्षक जितेंद्र कासार, ऋत्वीक गुदगे, बाजार समितीचे माजी संचालक दादासाहेब कचरे, पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष नामदेव शिंदे, संजय यलमर, ग्रामपंचायत सदस्य रणजित माने उपस्थित होते. 

गुदगे म्हणाले, शेतकर्‍यांना उरमोडीचे पाणी तारळी प्रकल्पाच्या कॅनॉलमधून पोचावे, या उद्देशाने शासनाच्या धोरणानुसार विठोबा पाणी वापर संस्था, यशवंतबाबा महाराज पाणी वापर संस्था, संत सावता माळी पाणी वापर संस्था व हनुमान पाणी वापर संस्थांची नव्याने निर्मिती करण्यात आली. या संस्था शासन आणि शेतकरी यांच्यातील धुवा ठरणार आहेत. त्यामुळे पाणी वाटपात समानता येणार आहे. पाण्यामुळे शिरसवडीपासून मायणीपर्यंतचा भाग ओलिताखाली येणार आहे. पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या माफक दरात शेतीला पाणी मिळणार आहे. पाणी वाटपाबाबत समानता येण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, असे सांगण्यात आले. दादासाहेब कचरे यांनी सूत्रसंचालन केले. अनिल माळी यांनी आभार मानले.

COMMENTS