उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू

डेहराडून : उत्तराखंडमधील चकराता येथे रविवारी भीषण दुर्घटना झाली. चकराता येथील दुर्गम भाग असलेल्या तुनी रोडवर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झा

नागरिकांच्या आरोग्याची सुरक्षितता यास सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री हसन मुश्रीफ
अपघातग्रस्तांचे राज्यमंत्री भरणे व पोलिसांनी वाचवले प्राण ! | LOKNews24
रंग लावण्याच्या भीतीने गच्चीत पळाला आणि घात झाला | LOKNews24

डेहराडून : उत्तराखंडमधील चकराता येथे रविवारी भीषण दुर्घटना झाली. चकराता येथील दुर्गम भाग असलेल्या तुनी रोडवर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चकराता येथील भरम खात येथील बायला गावातून विकासनगरकडे जाणारी युटिलिटी रविवारी भायला-पिंगुवा रस्त्यालगत नियंत्रणाबाहेर जाऊन खोल दरीत कोसळली.
प्राथमिक माहितीनुसार, गाडीत 16 जण होते. ताज्या माहितीनुसार या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस-प्रशासनाला माहिती देण्यात आली आहे. सध्या स्थानिक लोकांकडून मदतकार्य सुरू आहे. डेहराडून येथून एसडीआरएफ, जिल्हा पोलीस आणि अग्निशमन दलाची मदत पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडून जिल्ह्यातील चकराता येथे बुलहाड-बिला रस्त्यावर झालेल्या अपघातात लोकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी जिल्हा प्रशासनाला मदत आणि बचाव कार्य तीव्र करण्यास आणि जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्यास सांगितले आहे. 13 मृतांचे मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. पोलिस-प्रशासनाचे पथक घटनास्थळी हजर आहे. स्थानिक लोकही मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. माहिती मिळताच डेहराडून येथून एसडीआरएफ, जिल्हा पोलीस आणि अग्निशमन दलाचे मदत पथक घटनास्थळी रवाना झाले होते. एसडीएम सौरभ अस्वाल यांनी सांगितले की, पथक अपघातासाठी घटनास्थळी पोहोचले आहे. डेहराडूनचे डीएम डॉ. आर राजेश कुमार यांनी सांगितले की, एसडीएम आणि एडीएम घटनास्थळी पोहोचले आहेत. डेहराडूनमधील डॉक्टरांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आहे. डॉक्टरांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाईल, असे जिल्हाधकारी म्हणाले. मृत आणि जखमींना आर्थिक मदत देण्याची शिफारस सरकारकडे करण्यात आल्याचे ते म्हणाले.

COMMENTS