लखनऊ : उत्तरप्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) घातपाताचा मोठा कट उधळून लावत,दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. एटीएसने लखनऊमधील काकोरी भागात कारवाई
लखनऊ : उत्तरप्रदेश दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) घातपाताचा मोठा कट उधळून लावत,दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या. एटीएसने लखनऊमधील काकोरी भागात कारवाई करत, अल कायदा संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. उत्तर प्रदेश एटीएसचे आयजी जीके गोस्वामी यांनी सांगितले की, दहशतवाद्यांकडून साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याची योजना होती. त्यांच्याकडून जिवंत बॉम्बसह मोठा शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला. दहशतवाद्यांच्या निशाण्यावर भाजपचे बडे नेते असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह, सुनील बन्सल यांच्यासह अनेक नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होते. आयबी, एटीएस आणि इंटेलिजेंस टीम चौकशी करत आहेत. या दशतवाद्यांना अमर अल मंदी याने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिलेले होते. शाहिद नावाच्या व्यक्तीच्या घरात हे दहशतवादी लपून बसून आपला कट रचत होते. याबाबत एटीएसला एका आठवड्यापासून खबर लागली होते. त्यामुळे एक आठवड्यापासून एटीएसची या घरावर नजर होती. दोन-तीन संशयित व्यक्ती या घरात ये-जा करत होते. आज छाप्यादरम्यान 6 ते 7 किलो स्फोटकं जप्त करण्यात आले आहे. पश्चिम उत्तरपदेश व्यतिरिक्त हरदोई, सीतापूर, बाराबंकी, उन्नाव आणि रायबरेली या जिल्ह्यांसह लखनऊ आयुक्तालयाच्या हद्दीत दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेवरून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. अटक करण्यात आलेले अल कायदाचे दहशतवादी उत्तर प्रदेशमधील लखनऊसह काही जिल्ह्यांमध्ये बॉम्ब स्फोट घडवण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी दोन प्रेशर कुकर बॉम्बसह बरीच स्फोटके व विदेशी पिस्तूलं देखील जप्त केली आहेत. उत्तरप्रदेश पोलिसांनी आतापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. शाहिद खान गुड्डू आणि वसीम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार शाहिद पाच वर्षांपासून सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. तो टेलिग्रामद्वारे अल कायदा व पाकिस्तानी हस्तक अल-उल यांच्याशी बोलत होता. त्याला पकडण्यापूर्वी त्याने काही कागद व वस्तू जाळल्याची देखील माहिती समोर आली आहे. याशिवाय दोन प्रेशर कुकर बॉम्बसह बरीच स्फोटके, विदेशी पिस्तूल देखील जप्त करण्यात आली आहेत. लखनऊमध्ये दहशतवादी दडून बसले असल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकास (एटीएस) मिळाली होती. यानंतर तेथील काकोरी पोलीस ठाणे परिसरातील एक घराला एटीएसने वेढा कारवाई करत दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा होता कट
उत्तर प्रदेश एटीएसचे आयजी जीके गोस्वामी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश आणि लखनऊमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. जिवंत बॉम्ब देखील हस्तगत करण्यात आलेला आहे. संशयित दहशतवाद्यांचे काश्मीर कनेक्शन आहे. हे स्लीपर सेल होते. पण आता सक्रीय होऊन काम करत होते. आज किंवा उद्या लखनऊ व उत्तर प्रदेशमध्ये स्फोट घडवणार होते. त्यांच्याकडून बर्याचप्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत.
COMMENTS