उतावीळपणा नडला : शशी थरूरांनी मागितली मोदींची माफी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उतावीळपणा नडला : शशी थरूरांनी मागितली मोदींची माफी

बांगलादेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांचे पूर्ण वाक्य न ऐकता ट्वीटरवर टीका केल्याबद्दल काँग्रेस नेते शशी थरूर यांनी शनिवारी पंतप्रधानांची माफी मागितली आहे.

देशाच्या विकासात शिक्षकांचे योगदान-अरविंद धिरडे
अजित पवार गटावर कारवाई करा
नवरात्रोत्सवापूर्वीच फाल्गुनी पाठकच्या गरबा-दांडिया कार्यक्रमाविरोधात याचिका दाखल

नवी दिल्ली : बांगलादेश दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी यांचे पूर्ण वाक्य न ऐकता ट्वीटरवर टीका केल्याबद्दल काँग्रेस नेते शशी थरूर यांनी शनिवारी पंतप्रधानांची माफी मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर गेले आहेत. कोरोना संकटाच्या काळातील पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा आहे. ढाक्याजवळ असलेल्या सावर येथे शहिदांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पचक्र वाहिल्यानंतर केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, तेव्हा अटक होऊन तुरुंगवासही भोगला होता, असे म्हटले. यावर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी टीका केली होती. 

“आंतरराष्ट्रीय शिक्षण… आपले पंतप्रधान बांगलादेशला भारतीय फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहिती आहे की, बांगलादेशला कुणी स्वातंत्र मिळवून दिलं,” असे ट्विट करत शशी थरूर यांनी टीका केली होती. परंतु, काँग्रेस नेते शशी थरूर यांना ट्विट केल्यानंतर टीका करताना चूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रांजळ कबुली दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सॉरी म्हणत, माझी चूक असेल, तर ती मान्य करण्यात मला वाईट वाटत नाही. काल मी काही बातम्यांचे मथळे आणि ट्विट वाचून ट्विट केले होते. ‘बांगलादेशला स्वातंत्र्य कुणी मिळवून दिलंय हे सगळ्यांना माहिती आहे,’ असं मी म्हणालो होतो. नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींच्या योगदानाचा उल्लेख केला नाही, असा त्याचा अर्थ होता. पण त्यांनी त्याचा उल्लेख केला. सॉरी, म्हणत लगेच शशी थरूर यांनी दुसरे ट्विट केले आहे.

COMMENTS