इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना परदेशातून धमकी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना परदेशातून धमकी

इस्लामपूर/प्रतिनिधी : उरुण-इस्लामपूर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक व भाजपाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोस

जन्मदात्या बापाकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार | LOK News 24
गरब्याच्या ठिकाणी हुल्लडबाजी केल्यास कठोर कारवाई : पो. नि..चंद्रशेखर यादव
नेत्यांची भूमिती श्रेणी अन् जनतेची कंगाल श्रेणी!

इस्लामपूर/प्रतिनिधी : उरुण-इस्लामपूर नगरपरीषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक व भाजपाचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांना परदेशातील व्हाट्सअप नंबर वरून थेट धमकी देण्यात आल्याची लेखी तक्रार स्वतः निशिकांत भोसले-पाटील यांनी इस्लामपूर पोलिसात दिली आहे. निशिकांत पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तर समोरच्याच्या डोक्याचा केस ठेवणार नसल्याचा इशारा वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी पत्रकार बैठकीत दिला.
ते प्रकाश हॉस्पिटलमध्ये भाजप पदाधिकारी आयोजित पत्रकार बैठकीत बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर हुबाले, भाजपाचे इस्लामपूर शहराध्यक्ष अशोकराव खोत, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपा युवा मोर्चा इस्लामपूर शहर अध्यक्ष सतेज पाटील, अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. धैर्यशील मोरे म्हणाले, निशिकांत भोसले-पाटील यांची जडण-घडण सर्वसामान्य कुटुंबातुन झाली आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य, सामाजीक, राजकीय क्षेत्र असो अथवा इस्लामपूर शहरातील विकास असो किंवा कोणत्याही पक्षातून येणारा कार्यकर्ता असो समोरच्याला नेहमीच मदत करण्याची भुमिका दादांची राहीली आहे. त्यामुळे त्यांचा कधी ही कोणत्याच क्षेत्रात शत्रू तयार झाला नाही किंवा आहे. त्यांची लोकप्रियता वाढतच चालली मात्र अलिकडील दोन वर्षात राज्याची सत्ताकेंद्रे बदलली. पोलीस अथवा राज्य सरकारची राज्य सरकारी अधिकारी असो यांना समोर करुन प्रकाश शिक्षण मंडळ या संस्थेला व निशिकांतदादांना लक्ष बनवून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा काही राजकारणी करत आहेत. राजकीय लढाई विचाराने लढा, क्रुरतेने लढु नका अन्यथा पाण्याच्या प्रवाहाबाहेर तडपडणार्‍या माशासारखी अवस्था धमकी देणार्‍याच्या पाठीशी असणार्‍यांची झाल्याशिवाय राहणार नाही. निशिकांत भोसले-पाटील यांना अडचणीत आणण्याचा व त्यांच्या प्रतिमेला डाग लावण्याच्या दृष्टीने विरोधक अनेक पडद्या आडून सातत्याने प्रयत्न करत आहेत. राजकारण हे विचाराचे व विकासाचे व्हावे. आपल्या राजकिय स्वार्थापोटी विरोधकांच्या उभा राहिलेल्या संस्था मोडकळीस आणून नोकरदारांच्या पोटावर पाय आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तुमच्या छाताडावर पाय ठेवायलाही मागे-पुढे पाहणार नाही. सत्तेच्या जोरावर सरकारी पोलीस असतील अथवा वैद्यकीय व आरोग्य अधिकारी असतील यांच्यावर दबाव आणून त्यांना समोर करुन बदनाम करत असाल तर शहरातील कोणत्याही चौकात या पाप-पुण्याईचा हिशोब मांडु. सरकारी अधिकार्यांना समोर करून आमच्या विरुध्द लढणार्‍या मोठ्या माशाने वाळवा तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी काय केले? कोरोना रूग्णांची सर्वात जास्त संख्या वाळवा तालुक्यात आहे. तुमचे योगदान काय, अधिकार्‍यांच्या बैठका व पेपरमधील भपकेपणा यामुळे तालुका कोरोनामुक्त होणार नाही. एखादं हॉस्पिटल उभारा म्हणजे रुग्णसेवा काय असते ते समजेल. लोकांचे जीव जायला लागलेत. एकीकडे सेवा देणार्‍या डॉक्टरवर ही गुन्हे दाखल होतात. उपचार घेणार्‍या व मत्यू पावलेल्या कुटुबांतील नातेवाईकांच्यावर ही गुन्हे दाखल होतात. राजकीय महत्वकांक्षेसाठी हॉस्पिटलची चौकशीचा फार्स करुन बदनाम करण्याचा प्रयत्न याच तालुक्यात होतोय. म्हणजे या मोठ्या माशाला नेमकं काय साध्य करायचं आहे? असा प्रश्‍नही या बैठकीत विचारण्यात आला. सन 1984 मध्ये स्व. राजारामबापूंचे निधन झाले. त्यावेळी निशिकांत पाटील यांचे वय 12 वर्षे होते. त्या वयात त्यांनी राजारामबापूंची काय गद्दारी केली? त्यांच्या पाठीत कधी खंजीर खुपसला? दादांना आजही स्व. बापूंच्या बद्दल आदर आहे. विरोधकांसारखी निशिकांतदादांची विचारसरणी नसून यापुढे विकृत विचाराचे राजकारण झाले तर आम्ही जशास-तसे उत्तर देवू, असा इशारा शेवटी वाळवा तालुका भाजपा अध्यक्ष धैर्यशील मोरे यांनी दिला. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस संजय हवलदार, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्ष सुरेखाताई जगताप, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रविण माने, भाजपाचे वाळवा तालुक्याचे संघटन सरचिटणीस व प्रांजली अर्बन निधी बँकेचे चेअरमन संदिप सावंत, संघटन सरचिटणीस दादासाहेब रसाळ आदि उपस्थित होते.

अधिकार्‍यांनी काळजी घ्यावी
सांगली जिल्ह्यातील सरकारी प्रशासन आधिकारी असतील अथवा पोलिस खात्यातील अधिकारी असतील यांच्यावर मोठा दबाव असल्याचे दिसून येत आहे. या आधिकार्‍यांची इच्छा नसतानाही चुकिच्या गोष्टी घडवून एकाच नेतृत्वाला व संस्थेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. यामध्ये अधिकार्‍यांनाही कारवाईसाठी शाब्दिक बुक्क्यांचा मार खावा लागत असल्याची चर्चा अधिकार्‍यांच्या वर्तुळात व नागरिकांमध्ये दबक्या आवाजात सुरु आहे. अधिकार्‍यांनी प्रशासकीय चौकटीत राहुन व त्यांना असलेल्या आधिकाराचा योग्य वापर करून आपले कामकाज करावे. एखाद्या मंत्र्याच्या दबावाखाली विनाकारण समाजात चांगले काम करणार्‍यांना वेठीस धरू नये. जर दबावापोटी पदाचा गैरवापर करून कोणाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला तर आधिकार्‍यांच्यावरील जनतेतील विश्‍वासहर्ता संपून जाईल. कोणाच्या दबावापोटी कोणाला अडचणीत व बदनाम करण्याचा प्रयत्न झाला तर अधिकार्‍यांच्या विरोधात नाईलाजास्तव आम्हाला न्यायालयात कायदेशीर कारवाईसाठी याचिका दाखल करावी लागेल, असा इशारा पत्रकार बैठकित भाजपा पदाधिकार्‍यांनी दिला.

मॅसेजमध्ये मोदी, शहा व चंद्रकांत पाटील यांचा अवमान
चंद्रकांत पाटलांच्या मागे लपून जयंत पाटलांवर वार करू नका. स्वतः एका बाईला आयुष्यातून उठवणार्‍या चंपा ला सांगा, भाजपा काय, तुझा बाप मोदी, शहा जरी आले तरी आमच काय वाकडी करू शकत नाही. आणि शेवटी तुम्ही एक गद्दार आहे. राजारामबापूंच्या पाठीत खंजीर खुपसलाय तुम्ही, तुम्हाला एवढे सहज सोपे जावु देणार नाही आम्ही… वेट अ‍ॅण्ड वॉच…
अशा स्वरूपाचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, देशाचे गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व माजी मंत्री चंद्राकांत दादा यांच्या बद्दल अपशब्द वापरून निशिकांत दादा तुम्हाला एवढे सहज-सोपे जावू देणार नाही. वेट अ‍ॅण्ड वॉच… असा धमकी देणारा मॅसेज व्हॉट्स अ‍ॅप करणारा विकृत व असंस्कृत विचाराचा कोण आहे व त्याच्या मागे मोठा मासा कोण आहे? हे पोलिसांनी 15 दिवसात शोधून त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी. कारवाईस दिरंगाई झाल्यास सर्व पक्षीय उग्र आंदोलन करण्यात येणार असून त्याच्या परिणामास संपुर्ण प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही भाजपा पदाधिकार्‍यांनी पत्रकार बैठकीत दिला.

COMMENTS