आज मराठवाडा दौरा निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले नांदेड येथे आले असताना त्यांनी प्रतिनिधीशी संवाद स
आज मराठवाडा दौरा निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले नांदेड येथे आले असताना त्यांनी प्रतिनिधीशी संवाद साधताना नवाब मलिक यांच्यावर अत्यंत तिव्र भाषेत टिका केली .नवाब मलिक यांचे आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया सोबत संबंध आहेत का? ह्याची चौकशी एनसीबी मार्फत होणे गरजेचे आहे .असे नितीन चौगुले यांनी मत व्यक्त केले. तसेच लवकरात लवकर नवाब मलिक यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिस ठाण्यात नवाब मलिक यांच्या विरोधात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान गुन्हा दाखल करून तिव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही .असे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान चे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी केले आहे
COMMENTS