नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील भावली धरण परिसरात तब्बल 5500 कोटींची गुंतवणूक (investment) करून जलविद्युत प्रकल्प (hydrop
नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील भावली धरण परिसरात तब्बल 5500 कोटींची गुंतवणूक (investment) करून जलविद्युत प्रकल्प (hydropower project) उभारण्यात येणार आहे. त्यातून 5000 जणांना नोकरी मिळणार आहे. या प्रकल्पासाठी जेएसडब्लू एनर्जी समूहाने पुढाकार घेतला आहे. हा समूह राज्यात इतर चार ठिकाणी तब्बल 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. (Igatpuri hydropower project; 5500 crore investment, JSW invests Rs 30,000 crore in the state, 5,000 people will get jobs)
देशातील ऊर्जा क्षेत्रात बलाढ्य असणारा जेएसडब्लू एनर्जी समुहाने या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला आहे. ही कंपनी राज्यातही अजून 30 हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. याबाबतच्या करारावर कंपनी मंगळवारी सह्या केल्या आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात या करारावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
इगतपुरी तालुक्यातील भावली, जामडे, कालभोंडे व कोठाळे परिसरात हा महत्त्वकांक्षी जलविद्युत प्रकल्प साकारणार आहे. या वर्षी नाशिक जिल्ह्यात यापूर्वी दोन कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली आहे. रिलायन्सने दिंडोरीतल्या तळेगाव अक्राळे येथे 2100 कोटींची गुंतवणूक केली आहे. तर इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने याच औद्योगिक वसाहतीमध्ये कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. येत्या काळी महिन्यांत आणखीही काही उद्योग जिल्ह्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
COMMENTS