इंधन दरवाढीबाबत केंद्र व राज्य सरकारने इंधनांवरील करांमध्ये कपात करावी, या मागणीचे निवेदन एमआयएमच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
अहमदनगर/प्रतिनिधी-इंधन दरवाढीबाबत केंद्र व राज्य सरकारने इंधनांवरील करांमध्ये कपात करावी, या मागणीचे निवेदन एमआयएमच्यावतीने जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा महासचिव हाजी जावेद, मुफ्ती अल्ताफ अहमदनगरी, नगरसेवक आसिफ सुलतान, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शहनवाज तांबोळी, युवा शहर अध्यक्ष अमीर खान, मोहम्मद शेख, शौकत पिंजारी, तौसीफ इनामदार, इम्रान शेख, ऑल इंडिया युथ फेडरेशन शहर अध्यक्ष फिरोज शेख, आरिफ सय्यद, समीर बेग आदी उपस्थित होते. केंद्र शासन पेट्रोल मागे 33 टक्के प्रती लिटर तर डिझेल मागे 32 टक्के प्रती लिटर कर आकारते. त्याच प्रमाणे राज्य शासन पेट्रोल मागे 22 टक्के तर डिझेल मागे 22 टक्के कर आकारते. केंद्र व राज्य सरकारने जर दोन्ही इंधनांच्या दरात 25 टक्के करात कपात केली तर सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.
—
COMMENTS