आ. रोहित पवार, माजी मंत्री प्रा. शिंदेंचे खेळ ठरले राजकीय चर्चेचे विषय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आ. रोहित पवार, माजी मंत्री प्रा. शिंदेंचे खेळ ठरले राजकीय चर्चेचे विषय

कर्जत : प्रतिनिधी कर्जत तालुका तालीम संघाचे अध्यक्ष प्रवीण घुले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कर्जतमध्ये जंगी अशा 'पैलवान चषक' क्रिकेट स

अहमदनगर जिल्ह्यातील 223 गावांतून पूर येण्याची शक्यता…
साहित्य संमेलने ही माझ्यासाठी माणुसकीची तीर्थस्थळे – डॉ. बाबुराव उपाध्ये
कर्जत तालुक्यातील खेड गावामधील गरीब कुटुंबातील मत्स्य व्यवसाय करणाऱ्यांना गावगुंडाकडून मज्जाव.

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुका तालीम संघाचे अध्यक्ष प्रवीण घुले यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी कर्जतमध्ये जंगी अशा ‘पैलवान चषक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. कर्जतमध्ये घुले आणि नामदेव राऊत हे कट्टर राजकीय विरोधक आहेत. मात्र नामदेव राऊत यांच्या मातोश्री भामाबाई राऊत यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाल्याने कर्जतकरांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यावर मोठ्या राजकीय चर्चा रंगल्या.

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्जतमध्ये जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्या आहे. येथे महाविकासआघाडी होणार की निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार हे चित्र अद्यापही स्पष्ट होताना दिसत नाही. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले यांनी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली. बैठकीला मोठा प्रतिसाद मिळाल्याने ते एक प्रकारे शक्तिप्रदर्शनच ठरले.

आमदार रोहित पवार यांनी सोमवारी प्रवीण घुले यांना गाडीत सोबत घेऊन टाकळी खंडेश्वरीपासून कर्जतपर्यंतचा प्रवास केला. कर्जतमधील सर्व कार्यक्रम त्यांनी घुले यांना सोबत घेऊन केले. दिवाळी फराळ कार्यक्रमात आ. रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका मांडली. नगरपंचायतीची निवडणूक महाविकासआघाडीच्या माध्यमातूनच लढविली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर ते घुले यांच्या ‘पैलवान चषक’ पीचवर येऊन क्रिकेट खेळले. त्यामुळे नगरपंचायतीत महाविकासआघाडीची एक्सप्रेस धावणार असे चित्र दिसत आहे.

COMMENTS