आर्थिक उद्दिष्ट साध्यतेसाठी नियोजन आवश्यकच – स्वप्नील करवंदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आर्थिक उद्दिष्ट साध्यतेसाठी नियोजन आवश्यकच – स्वप्नील करवंदे

नगर -  सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनाचे महत्त्व या विषयावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी श्रीर

जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवणार्‍या दादावर कारवाई करा
राहात्यातील दुहेरी खुनाचे गुढ उकलले ; दाम्पत्याला संपवणारे तिघे जेरबंद, दोघांचा शोध सुरू
स्टार्ट अप योजनेतून नव उद्योजक तयार होतील : बापुसाहेब पुजारी

नगर – 

सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजनाचे महत्त्व या विषयावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांसाठी श्रीराम इन्व्हेस्टमेंटचे संचालक स्वप्नील करवंदे यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मार्गदर्शन करताना श्री. करवंदे म्हणाले की, मध्यमवर्गीय माणसाला आजच्या महागाईच्या काळात आपले आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी खूप मेहनत व कसरत करावी लागत आहे. एवढे सर्व करूनही त्याला त्यात तडजोड करावी लागते किंवा त्यासाठी कर्ज तरी घ्यावे लागते. आपल्या स्वप्नांना अशी मुरड घालावी लागू नये, म्हणून आणि मिळालेल्या पैशांची योग्य त्या गुंतवणुकीच्या माध्यमात योग्य वेळी व योग्य वयात गुंतवणूक कशी करावी व त्याचा पाठपुरावा सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कसा करावा, याबद्दल त्यांनी सविस्तर विवेचन केले.

आपल्या सर्वांच्या आयुष्यात सर्वांत महत्वाची असलेली गुंतवणूक ज्या पायावर उभी असते, त्मा आयुर्विमा, मेडिकल विमा व अपघात विमा हमी याविषयी त्यांनी थोडक्यात माहिती दिली. प्रिंसिपल सिस्टर करुणा शेंडे व सुपरवायझर शैला कुटिना यांच्या सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास 30 ते 40 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS