’आरे’ तील आदिवासींचा संसार पुन्हा उभा करणार; तनपुरे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’आरे’ तील आदिवासींचा संसार पुन्हा उभा करणार; तनपुरे

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या मुंबईच्या आरे कॉलनी पवई, पेरूवाडीतील आदिवासी पाड्यांची राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली.

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाला विरोध
दिव्यांगांच्या वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा
‘आज ना उद्या हे घडेल याची खात्री होतीच’ : शरद पवार | LOKNews24

मुंबई/प्रतिनिधीःतौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने नुकसान झालेल्या मुंबईच्या आरे कॉलनी पवई, पेरूवाडीतील आदिवासी पाड्यांची राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली. ’आरे’तील पाड्यांत आदिवासी बांधवांच्या अनेक घरांचे चक्रीवादळाने नुकसान झाले आहे. 

    आदिवासींचा हा मोडून पडलेला संसार पुन्हा उभा  करण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, असे आश्‍वासन या वेळी तनपुरे यांनी दिले. या पाहणी दौर्‍यात तनपुरे यांनी आदिवासी बांधवांना सर्वोतोपरी शासकीय मदत देण्याचे जाहीर केले. तसेच राष्ट्रवादी  काँग्रेस पक्षातर्फे कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांच्या पुढाकाराने आदिवासींना मदत देण्याचे आश्‍वासित केले. या पाहणी दोर्‍यात प्रकल्प अधिकारी, तलाठी तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष तथा प्रदेश प्रवक्ते अ‍ॅड. अमोल मातेले यांची उपस्थिती होती. आरे कॉलनीत आदिवासींच्या अनेक घरांची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. या वेळी नुकसानग्रस्त घरांची पाहणी केल्यानंतर तनपुरे यांनी प्रकल्प अधिकारी, आदिवासी विकास अधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी पवई व मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांना तात्काळ मदतीचे आदेश दिले.

COMMENTS